
कसं डौलात डोलतं
पिक माझं बाजरीचं
आलय चिकात कणीस
त्याला भ्याव पाखरांच
ढवळ्या,पवळ्यांनी माझ्या
साथ दिली औताला
कुळवणी करुन
केलं सपाट गवताला
पेरलं वावरात धान्य
पावसानी दिला दगा
घोकणी काळजाला
आर्जव केली ढगा
आलं तरारुन पिक
झालं हिरवं वावार
बहरात आली बाजरी
झालं हिरवं शिवार
सौ सुनंदा बाळासाहेब वाळुंज
ठाणे.















