prabodhini news logo
Home गडचिरोली विद्यार्थ्याने स्वयंशासन पद्धतीने शिक्षक दिन साजरा

विद्यार्थ्याने स्वयंशासन पद्धतीने शिक्षक दिन साजरा

0
253

सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी सिरोंचा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात यंदा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या औचित्याने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षक दिन म्हणजे शिक्षकाप्रती त्यांच्या सन्मान, आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. विद्यालयात यावर्षी स्वयंशासन पद्धतीने म्हणजे या दिवशी विद्यार्थ्यांनी एका दिवसासाठी मुख्याध्यापक ते शिपाई वर्ग पर्यंत वेशभूषा धारण करून विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापनाचा कार्य केले. यावेळी एक शिक्षक म्हणून, मुख्याध्यापक म्हणून, भूमिका निभावताना किती व कशा पद्धतीने पूर्ण नियोजनबद्ध करावे लागते, हे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाले. नंतर विद्यार्थिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये आपले मनोगत व्यक्त केले विद्यालयाचे मुख्याध्यापिका मनीषा साखरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या मुलींना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी त्या बोलत होते की, विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत असताना स्वयंशिस्त बरोबर स्वतःमध्ये जीवनात येणाऱ्या अडचणींना झेळण्याचे सामर्थ्य निर्माण केले पाहिजे. असे मार्गदर्शन केले. तसेच भाषा शिक्षक आर.डी अटटेला यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना वेळेचे नियोजन व व्यवस्थापन करणे .यावर तर श्रीमती. एस .रॉय यांनी विद्यार्थ्यांमध्ये असलेले सुप्त गुण व कौशल्य ओळखून विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्याने जीवनात यशस्वी होऊन एक सुजाण नागरिक बनेल,असे मार्गदर्शनात संबोधिले.या कार्यक्रमाचे नियोजन एम टेम्भूर्णी कु. जे रामटेके यांनी केले कार्यक्रमाचे संचालन कुमारी रितीशा कोंडा ,वनिता यांनी तर आभार कु.स्वरूपा हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवीना सोबत विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here