
श्रीगोंदा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी श्रीगोंदा येथे NMMS परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले त्या सर्वांचा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
त्या कार्यक्रमांचे अध्यक्ष मा.गट शिक्षण अधिकारी अनिल शिंदे साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,अरविंद कापसे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
संघर्ष क्लासेस मध्येल 8 वी चे या वर्षी 16 विद्यार्थीची निवड झाली.या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 48 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे, कापसे स्वरांगी, कुरुमकर समर्थ, लाहकर कृष्णा ,पवार सुरज, जामदार पृथ्वीराज, वाठोरे आदिती, रुद्र कुलकर्णी, मखरेश्वरा, धुमाळ गायत्री, रसाळ अनुष्का, सोहम रायकर, धनश्री श्रीमंदिलकर, भोस कृष्णा, उदमले प्रसाद , अर्जुन डेबरे,
8वी स्कॉलरशिप मध्ये क्लास च्या 6 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे , 5वी स्कॉलरशिप परीक्षेत क्लास च्या 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे .तसेच डॉ. C.V.रमण परीक्षेत इस्रो भेटी साठी 8 विद्यार्थ्यांची निवड झाली.अशी माहिती अनिल शेळके सर यांनी दिली.
प्रस्तावी संदीप कोळपे सर यांनी केले तर आभार सुनील दरेकर सर यांनी मानले. यावेळीं मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते.















