prabodhini news logo
Home चंद्रपूर शिक्षक दिनानिमित्त आश्रम शाळेत लहान मुलांना कपडे वाटप उपक्रम

शिक्षक दिनानिमित्त आश्रम शाळेत लहान मुलांना कपडे वाटप उपक्रम

0
132

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर ५ सप्टेंबर २०२५ – शिक्षक दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरातील आश्रम शाळेत लहान मुलांना कपडे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात शाळेच्या शिक्षिका तसेच अंजली मेश्राम, हेमलता खोब्रागडे, वंदना मनपे, स्वाती नगराळे व अन्य सदस्य उपस्थित होते.

मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत राहणे हेच आपले कर्तव्य असल्याचे यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. अशा प्रकारचे उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो, असे आयोजकांनी सांगितले.

शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना दिलेली ही अनमोल भेट त्यांच्या आयुष्यात प्रेरणादायी ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here