prabodhini news logo
Home धुळे प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – शिक्षक दिन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष लेख – शिक्षक दिन

2
410

दि ५ सप्टेंबर हा ” सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म दिनानिमित्त शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
शिक्षक हे देशातील सर्वोत्तम बुद्धिवंत असावेत असा राधा कृष्णन यांचा विश्वास होता.
भारतात प्राचीन काळापासून गुरु – शिष्य ही परंपरा आपण पाहिली वाचली आहे. अनेक उदाहरणे आहेत… उदा.. द्रोणाचार्य – अर्जुन. केळूसकर – डॉ आंबेडकर..

काळानुरूप शिक्षण प्रथा – व्यवस्था, बदलत गेल्या.. परंतु गुरूंची महती , महत्व आजही तितकेच आदरणीय आहे.
गुरूचा शाब्दिक अर्थ संपूर्ण, म्हणजेच जीवनाची परिपूर्णता प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपला मार्ग प्रकाशित करणारा.

गुरुगृही किंवा गुरुकुल मध्ये शिक्षण घेण्याची प्रथा होती..
ज्या संस्कारांनी विद्यार्थिचे संपूर्ण व्यक्तिमत्व विकसित होते त्या संस्काराला “शिक्षण” असे म्हणतात.
औपचारिक – औनपचारिक प्रशिक्षण दिल्या जात होते.
गुरुजीं, मास्तर व शिक्षक ही आदरार्थी नावे आजही प्रचलित आहेत.
शिक्षक म्हणजे

शि = शिलवान
क्ष = क्षमाशील
क = कर्तव्य निष्ठ
हे गुण विद्यार्थ्याला देऊ करणारा दुवा म्हणजे शिक्षक होय.

शिक्षण देण्याचे काम शिक्षक करीत असतो.

शिक्षक म्हणजे अशी व्यक्ती जीं ज्ञान , कौशल्य , ्मूल्ये , वृत्ती किंवा क्षमता शिकवून इतरांना मदत करणे. विद्यार्थ्यांना शिकण्यास मार्गदर्शन करतात , प्रेरणाश्रोत आणि त्यांच्या सामाजिक व भावनिक विकासास मदत करतात.

शिक्षकाचे काम केवळ शिकविणे नसून ते विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे आणि जबाबदार नागरिक बनवणारे किंवा त्यांच्या जीवनाचे शिल्पकार म्हणून काम करणारे एक महत्वाचे पद आहे.

शिक्षकांची विविध रुप अनुभवास येतात. आई स्वरूप, प्रेमळ, मायाळू दयाळू, कृपाळू, मैत्रीपूर्ण सहयोगी इत्यादी…
उत्तम शिक्षक कसा असावा किंवा शिक्षकांच्या अंगी कोणते गुण असावेत..
१ आवड – शिक्षकाला शिकविण्याची आवड असली तरच तो चांगले शिकवू शकतो. उदा. कथा, उदाहरण किंवा प्रात्यशिक दाखवून

२. संवाद कौशल्य – विद्यार्थिशी प्रेमाने समजावून शिकविणे.
3. ऐकण्याचे कौशल्य – प्रत्येक शिक्षकांच्या अंगी ऐकण्याची कला असावी तरच विद्यार्थिचे प्रश्न किंवा अडचण जाणून घेता येईल
4. मैत्रीपूर्ण वर्तन – मैत्रीपूर्ण वागणूक दिल्यास विद्यार्थी मनमोकळे पणाने बोलू शकतो आपल्या अडचणी मांडू शकतो.
5. आकर्षण क्षमता – विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी विषयाची मांडणी आकर्षक असावी.
6. संयम – विविध मानसिकता असलेली विद्यार्थी व पालक असतात.. त्यांना हाताळतांना शिक्षकांना संयम असणे अत्यंत महत्वाचे आहे.
7. प्रेरणा कौशल्य – विद्यार्थिशी वागताना शिकवताना शिक्षक हा प्रेरणास्थानी असावा.
8. चिकाटी – वारंवार अनेक प्रसंगाना सामोरे जातांना खचून न जाता, नैराश्य येऊ न देता चिकाटीने विषयाला हाताळण्याचे कौशल्य असावे.
9. निष्पक्ष – कोणताही भेदभाव न करता सर्व विद्यार्थिना समान वागणूक देणे.

अशी विविध गुण शिक्षकांच्या अंगी असावेत.

फिरत्या चकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तु वेडा कुंभार… असाच लहान वयात मुलांना आकार देण्याचे काम शिक्षक करीत असतात..

एक एक विद्यार्थीला घडवायला शिक्षकांना अनेक तप घालवावे लागतात… ” शिक्षक ” हा आई नंतर मुलांचा पाहिला आदर्श असतो..

विद्यार्थी घडवताना शिक्षकांस छडी हातात घ्यावी लागते… ( आताच्या समाजाने / शासनाने ती छडी काढून घेतली आहे. ) चांगला विद्यार्थी घडावा म्हणून स्वतःही नवनवीन शिक्षण, कौशल्य, तांत्रिक यांत्रिक प्रशिक्षण घेण्याची तयारी दर्शवितो…
बदलत्या शिक्षण पद्धती आत्मसात करुन अद्ययावत राहण्याचा प्रयत्न करतो..

आधुनिक शिक्षण पद्धती, शिक्षणा चे खाजगीकरण , बाजारीकरण शिक्षण क्षेत्रात वाढलेले द्रोणाचार्य यामुळे मात्र शिक्षक अडचणीत आले आहेत…

अशैक्षणिक किंवा शाळा बाह्य कामांमुळे शिक्षक दीन होतांना दिसतो आहे….
जास्तीत जास्त वेळ हा शाळाबाह्य कामे करण्यात जातो… उदा.. सर्वेक्षण , संगणकीय कामे , ऑनलाईन अहवाल, इतर विभागाशी समनव्य, पोषण आहार देखरेख, वितरण इत्यादी… त्यामुळे

समाजाची जीं उत्पादक पिढी आहे ती सन्मार्गातून प्रगती मार्गातून भरकटताना दिसते आहे…

ग्रामीण भागातील शाळा व शिक्षक अडचणीत आलेली आहेत…

गावोगावी शाळांचे वाढते खाजगीकरण त्यातील दिखाऊ शिक्षण, सुख सोयी, शिक्षण पद्धती स्पर्धा यामुळे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिची अनुपस्थिती, स्थलांतरित पालक, शाळा गळती प्रमाण या सर्वांचा शिक्षकांच्या भवितव्यावर गदा येत आहे.
कंत्राटीकरण खाजगीकरण या शासकीय धोरणामुळे देखील शिक्षकांचे भविष्य व पर्यायाने विद्यार्थ्यांचे ( गरीब मजूर ) भविष्य अडचणीत येतांना दिसते आहे…

साहजिकच शैक्षणिक दर्जा यावर सुद्धा परिणाम होतांना दिसतो आहे..

शिक्षकांच्या गुणवत्तेवर देखील त्याचा परिणाम होतांना दिसतो आहे..

दरवर्षी शिक्षक दिन हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो… विद्यार्थी शिक्षकांचे अनुकरण करुन शिक्षिकाची भुमिका साकारतात…., शिक्षकांचा सन्मान करतात,, पुरस्कार देतात किंवा शासनामार्फत ” आदर्श ” शिक्षक पुरस्कार दिला जातो.. ही समाजासाठी नक्कीच भूषणावह बाब आहे..
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याची धारणा होती की,

चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा , सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे. समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही तर तो आदर्श शिक्षकांमुळे होत असतो.
शिक्षकाचे महत्व असाधारण आहे, हे जाणल्या शिवाय आपली तांत्रिक यांत्रिक प्रगती होणार नाही….

श्रीमती सुनंदा निकम
धुळे

2 COMMENTS

  1. शिक्षक दिनाची खूपच छान माहिती दिली निकम मॅडम यांनी
    मॅडम हार्दिक अभिनंदन 💐💐💐🌹🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here