prabodhini news logo
Home चंद्रपूर भिम आर्मी (भारत एकता मिशन) जिल्हा चंद्रपूर संघटनेत अनेक युवकांचा वाढता कल

भिम आर्मी (भारत एकता मिशन) जिल्हा चंद्रपूर संघटनेत अनेक युवकांचा वाढता कल

0
141

जुन्या सैनिकांना पदोन्नती देऊन त्यांच्या कार्याचा गौरव.

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी रय्यतवारी येथील निमवाटिका परिसरात अनेक युवकांनी भिम आर्मी (भारत एकता मिशन)जिल्हा चंद्रपूर इथे प्रवेश केला तसेच जुन्या सैनिकांच्या कार्याचा गौरव करत जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र रायपुरे यांनी त्यांना खालील प्रमाणे पदोन्नती देऊन मान सन्मान प्रदान केला.
अनिकेत रायपुरे जिल्हा महासचिव, हिमांशू आवळे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष, जिल्हा प्रवक्ता राजेश शेडमाके, राजू सोदारी महानगर प्रमुख, रेखा धोटे महानगर उपप्रमुख, छबीता धोटे रय्यतवारी प्रमुख, पौर्णिमा रामटेके जिल्हा कोर कमिटी सदस्य यांची निवड करण्यात आली.
प्रासंगिक कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र रायपुरे यांनी फुले शाहू आंबेडकरांची चळवळ सोबत भगवान बुध्दाची करुणा आणि शांती यांचे संघटनेत असलेले महत्व, प्रामाणिक कार्यकर्त्यांची जोड किती महत्वाची आहे या बद्दल विस्तृत माहिती दिली.
जिल्हा संघटक विशाखा आमटे यांनी प्रामाणिकपणे संघटनेत कार्य करताना कश्या अडचणी येतात, कसे आरोप पत्यारोप होतात आणि त्याचा कार्यक्षमतेवर कसा परिणाम होतो. आणि त्यातून शेवटी सत्याचा कसा विजय होतो यावर विस्तृत मार्गदर्शन केले.
महानगर उपप्रमुख (महिला) रेखा धोटे यांनी सांगितले की घरचे सर्व काम सांभाडीत भिम आर्मीत आम्ही कार्य करतो याचा आम्हला गर्व आहे, तसेच आम्ही सर्वाना आपल्या परिवारातील एक सदस्य मानतो.
राजू सोदारी यांनी सुद्धा संघटनेत एकी आणि अनुशासन कसे महत्वाचे आहे यावर भाष्य केले.
राजेश शेडमाके यांनी त्यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकीत ते आंबेडकरी चळवळीच्या प्रवाहात कसे आले याबद्दल भाष्य केले.
तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून भिम आर्मी (भारत एकता मिशन ) मध्ये प्रामाणिकपणे तन मन धनाने फुले शाहू आंबेडकर चळवळ वाढविण्यास कटीबद्ध राहूत अशी ग्वाही जिल्हा अध्यक्ष सुरेंद्रभाऊ रायपुरे यांना दिली.
प्रसंगी बल्लारपूर शहर प्रमुख शशिकांत निरंजणे, जिल्हा सदस्य शुभम चिवंडे,भीमराव आमटे सोबत अनेक सैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here