
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मदतीचे वाटप
सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – सिरोंचा तालुका अंतर्गत येत असलेल्या मंडलापूर येथील रहिवासी व्येंकटस्वामी गड्डम (वय ४८) यांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. नव उलटल्याने झालेल्या या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबाला मदतीचा हात पुढे करत, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी आर्थिक मदत जाहीर केली.
सदर मदत सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी, नगरसेवक सतीश भोगे व उपसरपंच रवी संतोषपू यांच्या हस्ते कुटुंबीयांना देण्यात आली. यावेळी तिरुपती रेड्डी पोट्टु, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मदतीमुळे शोकाकुल कुटुंबाला थोडा दिलासा मिळाला असून, ग्रामस्थांनी आमदार आत्राम यांचे आभार मानले आहेत.















