prabodhini news logo
Home गडचिरोली जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेचे मुलीने मारली बाजी

जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेचे मुलीने मारली बाजी

0
132

प्रतिनिधी सिरोंचा:दिनांक 4 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2025 पर्यंत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा क्रीडा संकुल सिरोंचा या ठिकाणी आयोजित करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या खेळ त्यामध्ये कबड्डी, खो-खो, कुस्ती, व्हॉलीबॉल,200 मीटर 400, 600 मीटर धावणे,गोळा फेक, इत्यादी असे विविध प्रकारांचे खेळांचे नियोजित होते. या खेळ स्पर्धेत विजय संघ दिनांक 9. 9. 2025 ला जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित यामध्ये डॉजबाल या क्रीडा प्रकारात जिल्हा परिषद हायस्कूल तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सिरोंचा येथील सतरा आणि 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने बाजी मारली, तर 14 वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत नितीन गड्डम विजयी. त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. एन.आर. मरस्कोले यांनी विजय संघाचा व प्रशिक्षक श्री मादेशी सर,श्री. ए.डब्ल्यू सोनेकर यांच्या अभिनंदन करत शाळेचे उच्च श्रेणी शिक्षक श्री. के.वाय जगदाभी यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मेहनत , प्रबळ इच्छाशक्ती, वेळेचे नियोजन, यावर प्रकाश टाकत विजय संघांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here