
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – पाकिस्तान हा देश गेल्या कित्येक वर्षांपासून भारतात दहशतवाद घडवून आणतोय. २६ भारतीय महिला, शेकडो जवान आणि हजारो निरपराध नागरिक पाकिस्तानी दहशतवादामुळे हकनाक बळी गेले. अशा परिस्थितीत भारत सरकारने पाकिस्तानला कधीच प्रोत्साहन देऊ नये. परंतु बीसीसीआयचे अध्यक्ष जे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र आहेत, त्यांच्याकडून संवेदनशीलतेची अपेक्षा होती. मात्र भारत मातेच्या वीरांच्या बलिदानाचा विचार न करता त्यांनी पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळविण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंधूर मोठ्या थाटामाटात राबवले, पण पाकिस्तानच्या विरोधात ठोस पावले उचलताना ते दिसत नाहीत. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान होत असताना फक्त दिखावा करणारे कार्यक्रम राबवले जातात.
जर भारत–पाक सामना झाला, तर तो केवळ भारत मातेच्या वीर मुलांचा आणि वीरांगनांचा अपमान ठरेल. त्यामुळे हा सामना तात्काळ रद्द करावा, अशी ठाम मागणी आम आदमी पार्टी, पुणे शहराध्यक्ष प्रशांत कांबळे, सा.न्या. विभाग यांनी केली आहे.















