prabodhini news logo
Home चंद्रपूर मनसे ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष सूरज शेंडे यांचा राजीनामा.

मनसे ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष सूरज शेंडे यांचा राजीनामा.

0
354

रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी मनसे तालुका अध्यक्ष पदावर असताना पक्ष कार्यासाठी वाहून घेत व वेळोवेळी पक्षाचे उपक्रम राबवून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या ब्रम्हपुरी सारख्या क्षेत्रात मनसेचं नाव मोठे करत असताना मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार हे अडचणी निर्माण करून काम करू देत नसल्याचा आरोप करत पदावर राहून पक्षकार्य करता येत नसेल तर पदावर राहून काहीही फायदा नाही त्यापेक्षा मी महाराष्ट्र सैनिक बनून आपल्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणे माझ्यासाठी कधीही योग्य राहिलं असे म्हणत आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्र ब्रम्हपुरी मनसे तालुका अध्यक्ष सूरज शेंडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
चंद्रपूर मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार याच्याकडे वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी या तीन विधानसभा क्षेत्र आहे त्यात चिमूर हे त्यांचं स्वतःचं गृह गाव आहे तिथे एक तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष सुद्धा ते बनवू शकले नाहीत. प्रसिद्ध सरपंच चिमूर उपजिल्हा अध्यक्ष प्रशांत कोल्हे , नागभीड तालुका अध्यक्ष बंडू गेडाम, शहर अध्यक्ष सुधीर राजगडकर, असे अनेक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालामवार यांच्या त्रासामुळे पक्ष सोडून गेले आहेत. सावली तालुक्यात तालुका आणि शहर अध्यक्ष नाही, सिंदेवाही तालुक्यात तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष आहे पण पक्ष कार्य शून्य आहे, नागभीड मध्ये मागील दोन वर्षांपासून तालुका आणि शहर अध्यक्ष नाही,पक्ष संघटन बांधण्यासाठी कार्यकर्ते वाढविणे गरजेचे आहे पण जिथे कार्यकर्ते आहे तिथे कार्यकर्ते तोडणे व स्वतःचे वाळूचे धंदे हा पक्षाच्या आडोशाने चालवतो त्यामुळे तिन्ही विधानसभा क्षेत्रात मनसेची ताकत ही कमजोर झाली आहे आणि माझ्या क्षेत्रात एकमेकात झगडे लावून पक्षाचे संघटन संपवले आहे, त्यामुळे मी जर तालुका अध्यक्ष असलो तर माझ्यावर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडनुका हरल्याचा ठपका लागेल त्यापेक्षा मी महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करेन, त्यामुळे माझा राजीनामा स्वीकार करून मला पदमुक्त करावे अशी विनंती मनसे ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष सूरज शेंडे यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here