
सरपंच शिवशंकर मुंगाटे यांनी अड्याळ ग्रामवासियांतर्फे केला पालकमंत्री यांचा नागरी सत्कार
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यमंत्री गृह (ग्रामीण) ,गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खणीकर्म महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री भंडारा व वर्धा जिल्हा डॉ. पंकज भोयर यांनी ग्रामपंचायत कार्यालय अड्याळ येथे भेट दिली असता सरपंच शिवशंकर मुंगाटे यांनी शब्दसुमनाने व शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्याप्रसंगी अड्याळ गावातील अनेक समस्यांवर चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले . यामध्ये
१)ग्रामपंचायत ला लागून असलेली जागा निस्तारहक्क कमी करून ग्रामपंचायत ला हस्तांतरित करणे तसेच सुसज्य बसस्थानकाची व्यवस्था करून देण्याबाबाद २) घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास रेती निःशुल्क देण्यात यावी ३)अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात गैरसोई दुरुस्त करून अद्यावत सोयी सुविधा करून देण्याबाबत ४) गुजरी चौक अड्याळ येथील पाणठेला हटविण्याबाबद ५) कसरबोडी गट क्र. १४४५ या ठिकाणी गावातील युवक तसेच नागरिकांन साठी क्रीडांगण तसेच गार्डन साठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी.
या प्रसंगी भंडारा जिल्हा परिषद अड्याळ क्षेत्र सदस्या सौ. सुवर्णाताई मुंगाटे, जि. प. सदस्य लाखांदूर प्रतीक उईके ,भाजपा भंडारा जिल्हा अध्यक्ष आशू गोंडाने , पवनी तालुका अध्यक्ष तिलक वैद्य , अड्याळ ग्रा. पं. सदस्य आशिक अंबादे , विपिन टेंभुर्णे , सौ.यामिनीताई निकोळे , सौ. वसुश्रीताई टेंभुर्णे , सौ.मनोरमाताई मडावी ,श्रीमती नम्रताबाई मडकवार , भाजपा तालुका महिला आघाडी सदस्या ताराबाई कुंभलकर , करिष्मा मोहरकर, कल्पना साठवणे ,रेखा कुंभलकर, उत्तमजी गाडेकर,विकास टेंभुर्णे, नामदेव भुजाडे,सुभाष कुबडी,विठ्ठल बोरीकर,चंदूभाऊ कोडपे, वसंता शिवरकर, संजय फुलबांधे,शेखर दिघोरे, विजय डंभारे,जितेंद्र बोरीकर ,गणेश वंजारी, पिंटू टेकाम, उमेश मानकर,जयेश भोयर ,सचिन नंदनवार, किरण देशमुख, भारत कराडे , स्वप्नील धुळसे तसेच ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते .















