prabodhini news logo
Home चंद्रपूर शिव मंदिर, शिव नगर,तुकुम चंद्रपुर येथे आध्यात्मिक विश्वविद्यालय तर्फे माता शारदा मुर्तिचे...

शिव मंदिर, शिव नगर,तुकुम चंद्रपुर येथे आध्यात्मिक विश्वविद्यालय तर्फे माता शारदा मुर्तिचे आध्यात्मिक अर्थ या विषयी ईश्वरीय संदेश

0
78

प्रणाली येरपुडे विशेष तालुका प्रतिनिधी चंद्रपूर – शिव मंदिर, शिव नगर,तुकुम चंद्रपुर येथे दिनांक २७.०९.२५ रोज शनिवार सायंकाळी ८.०० वाजता आध्यात्मिक विश्वविद्यालय तर्फे  प्र.ब्र.कु. वर्षामाता , चंद्रपुर यांनी “माता शारदा मुर्तिचे आध्यात्मिक अर्थ,या विषयी ईश्वरीय संदेश देऊन मार्गदर्शन  केले .यावेऴी त्यांनी सांगीतले की  सारी ” वसुधा एक कुटुम्ब ” बनविनयाचे कार्य आध्यात्मिक विश्वविद्यालय तर्फे कार्यन्वित केलया गेले आहे .
शारदा माता मुर्तिचा अध्यात्मिक अर्थ समजावुन सांगतांना ती पुजनिय का ? पुजा पवित्रतेची होत असते . शारदे ला सरस्वती ची देवता मानतात . आज या सुष्टिवर सर्वात अमुल्य वेऴ आहे . एकदा गेलेला सेकंद  पुनहा परत आणता येत नाही तेवहा तो वेऴ आपन कोणत्या कार्यात उपयोगात आणतो यांचे चिंतन मंथन केले पाहीजे कारण कर्माणीच आपले जन्म जन्मांतर चे भाग्य बनत असते . जिची पुजा का होते  कारण तिने श्रेष्ठ कर्म केले . कुणी दिल तिला हे कर्माचया गुह्य गति चे ज्ञान
 श्रीमद् भगवत गीता श्लोक यदा यदा ही धर्मस्य —-नुसार तो विश्वनाथ या सुष्टि वर साकार मेधये या सुष्टि वर येऊन पुरानी दुनियेचा विनाश आणि नविन सतयुगी दुनिया ची स्थापना करतो व सत्य ज्ञान देतो . सत्य ज्ञानाने ती सविता:ला ओऴखते आणि ईशवरालीही आणि त्याचया हया कार्यात सहयोगी बनुन आपले जन्म जन्मांतर चे श्रेषठ भाग्य बनविते  .श्रीमद भगवदगीतेच्या अध्याय ३ मधील श्लोक ९ मध्ये (कर्मयोग) श्लोक
“यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः। तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ।”
या श्लोकात भगवान अर्जुन ला समजावून सांगतात की यज्ञाव्यतिरिक्त इतर कर्म बंधनात  हां संसार कर्मबंधनात टाकनारा आहे . म्हणून, हे कौन्तेय, आसक्तीपासून मुक्त व्हा आणि यज्ञाच्या उद्देशाने कर्म करा. ईश्वराने सांगितले आहे.
भगवद गीता, अध्याय 3, श्लोक 21
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः। स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ।
भावार्थ – या श्लोकात भगवान  सांगत आहे की,   श्रेष्ठ पुरुष जे  आचरण करतो, इतर लोकही त्याच्यानुसार वागतात. लोक फक्त तेच अनुसरतात जे तो सिद्ध करतो.
आपण कोणतीही कृती करतो, इतर आपल्याला पाहतील आणि तेच करतील. करिता श्रेष्ठ कर्म करावे कारण श्रीमत भगवत गीता संन्यासाला नाही सांगीतली आपल्याला संन्यासी नाही बनायचे.
तिची नुसतीच पुजा अर्चना न करता निचे गुण आपल्या जिवनात प्रत्यक्षात उतरवावे हीच तिची पुजा होय .लक्ष्मि ला कमलफुलाचे आसन दाखवितात याचेकारनच ते आहे कि लक्ष्मी या संसार रूपी किचडमधये राहुनच ईश्वरीय कार्यात सहयोगी बनली .
सुष्टि परिवर्तनाचा अमुल्य समय आता सुरू आहे तेवहां थोड़े थांबुन आपल्या कर्माचे काय प्रालब्ध बनत आहे हे तपासुन मगच पुढील कार्य करावे समय अमुल्य आहे . ईश्वरीय श्रेष्ठ कार्सयात सहयोगी बनुन श्रेष्ठ कर्माचे प्रारब्ध आपन सहज नविन सतयुगात जाऊं शकतो .
सर्वांना नविन युगांत येनयाबददल शुभेच्छा देते आपनास भक्ति चे फऴ ज्ञान प्राप्त होवो अशा शुभेच्छा देत ईश्वरीय संदेश समाप्त केला .
यावेऴी मोठयासंखेत महिला भक्तगण तसेच शिव शारदा भजन म़डऴाचया अध्यक्षां सह सर्व सदस्यांनी सतसंगाचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here