prabodhini news logo
Home ठळक बातम्या मीरा-भाईंदरमध्ये पाणीपुरवठ्याबाबत रहिवासी महिलांचा आंदोलण

मीरा-भाईंदरमध्ये पाणीपुरवठ्याबाबत रहिवासी महिलांचा आंदोलण

0
101

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
8104170564
mojissports@gmail.com

मीरा रोड: मीरा-भाईंदर शहरातील पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये तळमळ निर्माण झाली आहे. शनिवारी मीरा रोडवर शेकडो महिलांनी रस्त्यावर उतरून पालिकेविरोधात निदर्शने केली. या निदर्शनात महिलांनी आपला संताप व्यक्त केला आणि पाण्याच्या समस्येबाबत मनसेनेदेखील पाठिंबा दिला.

महिलांच्या मते, पाण्याची कमतरता असूनही महापालिकेकडून आठवड्यांपूर्वीच दोनदा दुर्दैवाच्या नावाखाली पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. विशेष म्हणजे शनिवार, रविवारी किंवा सणासुदीच्या काळात पाणी मिळत नसल्याने टँकर माफियांचा गैरफायदा झाला आहे. बाहेरून पाणी विकत घेणे नागरिकांसाठी परवडत नाही.

त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचा रोजचा गाडा विस्कळीत झाला आहे. कपडे धुण्यासाठी इतरांच्या घरांची मदत घ्यावी लागते. महिलांनी महापालिकेला तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here