prabodhini news logo
Home चंद्रपूर भिम आर्मी (भारत एकता मिशन) वतीने मुख्य महाप्रबंधक वेकोली यांना निवेदन

भिम आर्मी (भारत एकता मिशन) वतीने मुख्य महाप्रबंधक वेकोली यांना निवेदन

0
160

प्रणित तोडे चंद्रपूर शहर प्रतिनिधी – भिम आर्मी (भारत एकता मिशन) जिल्हा संघटक विशाखा आमटे यांच्या नेतृत्वात आज दिनांक 5 ऑक्टोम्बर रोजी मुख्य महाप्रबंधक वेकोली यांना निवेदन देण्यात आले.

विशाखा आमटे यांनी त्यांचे आभार मानले कारण भिम आर्मीच्या मांगणीचीच दखल घेत निमवाटिका या परिसराचे सुशोभीकरण करून एक सुंदर असा बगीचा निमवाटिकेच्या रूपात इथल्या वासियांसाठी निर्माण करून दिला आहे.
आता त्या निमवाटिकेत शेकडोच्या संख्येने लोक सकाळ संध्याकाळ फिरायला शुद्ध हवा घ्यायला येत असतात. आणि सध्य स्तिथीत त्या परिसरात गवत व झुडपी कचरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे तिथे सरपटणाऱ्या प्राण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. साप, विंचू निघणे हे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी फिरणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे, आणि काही फिरत आहेत तर ते जीव मुठीत घेऊन.
सदर निवेदनात आम्ही अशी मांगणी केली आहे की निमवाटिका या परिसरात गवत व झुडपी कचरा चार दिवसाच्या आत पूर्णतःसाफ करून देण्यात यावा अन्यथा भिम आर्मी तर्फे आंदोलन उभारल्या जाईल तसेच त्या दरम्यान कुणाची जिवहाणी झाल्यास सर्वस्वी जवाबदारी ही वेकोली प्रशासनची राहील.
प्रसंगिक जिल्हा कमिटी सदस्य पौर्णिमा रामटेके, भीमराव आमटे, महानगर उपप्रमुख रेखा धोटे, रय्यतवारी शाखा प्रमुख छबिता धोटे उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here