
विजयादशमीचा सण
सण साजरा हा होतसे
आनंदित हे घरदार
घरदार सुखी हे असे
तयार तत्पर सगळे
सगळे दूर सीमापार
मनाचा गळुनिया गर्व
गर्व होईल त्तडीपार
दसरा हा साजरा करु
करू निर्धार वेगळा
भ्रष्टाचार ग्रस्त असे हे
हे बाळगी अंतरी कळा
रामराज्य येईल तेव्हा
होईल स्वप्नपूर्ती जेव्हा
जेव्हा न्याय मिळता तया
स्वप्नपूर्ती होईल तेव्हा
नवरात्राची उपासना
उपासना करुनी मनी
वागणे असू दे रे शुध्द
शुध्द भाव येती जन्मूनी
(स्वरचित)
नीला चित्रे
चिंचवड पुणे















