
वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका उपजिल्हा रुग्णालय वरोरा
वरोरा प्रतिनीधी प्रबोधिनी न्युज – दिनांक ६ आक्टोबर २०२५ ला उप जिल्हा रूग्णालय वरोरा, जि.एम.आर . कंपनी, वर लक्ष्मी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २ आक्टोबर ते ८ आक्टोबर हा सप्ताह दान उत्सव आयोजित केला आहे.त्यापैकी दिनांक ६ आक्टोबर २०२५ ला डोंगरगाव रेल्वे येथे दान उत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला व्यासपीठावर गावच्या प्रथम नागरिक ईंदुताई खिरटकर, वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या, ताराचंद खिरटकर, जी.एम.आर. विवेक ढोके कंपनिचे माॅनेजर, बालक्रुण्णन हरी, शंकर यादव, ऊपस्थीतीत होते.प्रथमत: वंदना विनोद बरडे यांनी तुकडोजी महाराजांच्या फोटोचे पुजन, दिपप्रज्वलन सर्वांनी केले कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी अवयव दानाची माहीती व शपथ दिली त्याचा प्रचार प्रसार व जनजागृती करून अवयवदान, देहदान करण्याचे आवाहन केले सोबत अवयव दाना विषयी किंवा कुठल्याही दाना विषयीचे फायदे तोटे व समज गैरसमज समजावून सांगितले.नंतर ताराचंद खिरटकर उपसरपंच यांनी जनजागृती पर माहीती सांगितली.सूत्रसंचालन संध्या माकोडे यांनी केले.आभार प्रदर्शन सचिव सोनार माॅडम यांनी केले. कार्यक्रमाला मनोज पाल आय.सि.टि.सी. कौन्सिंलर, पुनम धांडे सिकलसेल टेक्निशियन उपस्थित होते.















