
नम्रता सरदार (रामटेके) मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दिनांक १० आक्टोबर २०२५ ला मानसिक आरोग्य दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला डॉ. प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधिक्षक, डॉ प्रविण केशवानी, वंदना बरडे सहायक अधीसेवीका, डॉ . प्रियंका शेलोटकर उपस्थित होते.दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सर्व मान्यवरांनी मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन केले सुत्रसंचलन नेहा इंदुलकर यांनी केले.

आभारप्रदर्शन तणीष्का खडसाने यांनी केले कार्यक्रमासाठी मदत कल्याणी कस्तूरे,सोनल भगत, हर्षा बालपांडे , प्रविण नवले यांनी केले.वंदना बरडे यांनी १० आक्टोबर दिनविशेष राष्ट्रीय टपाल दिवस, जागतिक अंडी दिवस,फाशिच्या शिक्षेविरुध्द जागतिक दिन,हाॅन्डबाॅग दिवस लापशी दिवस विषयी माहिती दिली व प्रदर्शनी लावून जनजागृती प्रचार व प्रसार करण्यात आली. तसेच जिल्हा स्तरावरील राष्ट्रीय गुणवत्ता असेसर यांनी कार्यक्रमाला उपस्थित होते.















