prabodhini news logo
Home ठळक बातम्या अनधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्यांचे ट्रेड प्रमाणपत्र रद्द करणार — परिवहन मंत्री प्रताप...

अनधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्यांचे ट्रेड प्रमाणपत्र रद्द करणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

0
114

मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : राज्यातील अनधिकृत मल्टी ब्रँड आउटलेट्स (MBO) मार्फत होणाऱ्या वाहन विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

अनधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरवणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांचे ट्रेड प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश त्यांनी परिवहन आयुक्तांना दिले.
‘MBO’ विक्रेते कोणताही महसूल न देता, ट्रेड सर्टिफिकेटशिवाय वाहन विक्री करत असल्याची बाब पुढे आली आहे.
या प्रकरणात कायद्याच्या कक्षेत राहून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.
या बैठकीत परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, फेडरेशन अध्यक्ष सचिन महाजन यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

एसटी बसस्थानकांवर ‘हिरकणी कक्ष’ उभारणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनला त्यांच्या CSR फंडातून स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’ उभारण्याचे आवाहन केले.
फेडरेशनने पहिल्या टप्प्यात ५१ बसस्थानकांवर ‘हिरकणी कक्ष’ उभारण्याची ग्वाही दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here