
असे आव्हान आजाद समाज पार्टीचे (कांशीराम),वर्धा जिल्हा अध्यक्ष मनीष फुसाटे
वर्धा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – वर्धा महाराष्ट्र सामाजिक आणि राजकीय चळवळीला गतिमान करण्याकरता बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित नागपूर येथे “विशाल प्रबुद्ध जनसंमेलन नागपूर येथे 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन 14 ऑक्टोंबर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून आजाद समाज पार्टी (कांशीराम), च्या वतीने कार्यक्रमाचे स्थळ कविवर्य सुरेश भट सभागृह रेशमी बाग मैदान नागपूर येथे दुपारी 1 वाजता विशाल प्रबुद्ध जनसंमेलन चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ऍड. चंद्रशेखर आझाद जी( आजाद समाज पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष), तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये गौरी प्रसाद उपासक (माजी मंत्री, उत्तर प्रदेश सरकार व केंद्रीय प्रभारी महाराष्ट्र), मा. रुपेश जी बागेश्वर राज्य प्रभारी, मनीष साठे प्रदेशाध्यक्ष, डॉ. मानसी ताई पवार उपाध्यक्ष, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात राज्यभरातील पदाधिकारी ,कार्यकर्ते, आणि प्रबुद्ध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून सामाजिक न्याय, सविधान रक्षण, युवकाचे राजकीय सशक्तिकरण आणि बहुजन एकतेचा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान वर्धा जिल्हा अध्यक्ष मनीष फुसाटे आजाद समाज पार्टी(कांशीराम), तसेच वर्धा जिल्हा मीडिया प्रमुख पद्माकर कांबळे यांनी केले आहे.















