
सुमित हस्तक आणि सुरज शाहा यांच्यावर विश्वासाचा शिक्का…
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर जिल्हा युवासेनेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, या नव्या कार्यकारिणीत शिवसेनेचे निष्ठावंत, कार्यतत्पर आणि जनतेच्या हितासाठी सतत झटणारे सुमित हस्तक यांची युवासेना जिल्हा संघटक (वरोरा – चिमूर – ब्रम्हपुरी विधानसभा) म्हणून, तर तडफदार आणि उत्साही शिवसैनिक सुरज शाहा यांची युवासेना लोकसभा सचिव पदी म्हणून निवड करण्यात आली आहे.
ही नियुक्ती युवासेना प्रमुख खासदार श्रीकांत शिंदे, कार्याध्यक्ष पुर्वेश दादा सरनाईक,पूर्व विदर्भ सचिव शुभम दादा नवले, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य हर्षल शिंदे, आणि जिल्हा प्रमुख आलेख भाऊ रट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
नव्या जबाबदाऱ्यांचा स्वीकार करताना सुमित हस्तक व सुरज शाहा यांनी जाहीर केलं —
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवून, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक युवासैनिक आणि शिवसैनिकाला एकजुटीने ठेवत चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेचा झेंडा नव्या जोमाने फडकवू!”
या नियुक्त्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील युवासेनेत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शिवसैनिक आणि युवासैनिकांत नव्या जोमाने कार्याची ऊर्जा निर्माण झाली आहे.















