
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा उपक्रम
प्रणित तोडे चंद्रपूर शहर प्रतिनिधी – चंद्रपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फटाके मुक्त दिवाळी अभियानांतर्गत विद्यामंदिर हायस्कूल ऊर्जानगर,चंद्रपूर येथे मा.पी.एम.जाधव सह कार्यवाहक वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प,जिल्हा कार्याध्यक्ष नारायण चव्हाण, दुरेंद्र गेडाम जिल्हा प्रधान सचिव व देवराव कोंडेकर कार्याध्यक्ष,संजय जुनारे अध्यक्ष महा अंनिस ऊर्जानगर,मुख्याध्यापक पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली फटाके मुक्त पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा कार्यक्रम शाळेची प्रार्थना झाल्यानंतर घेण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंनिस ऊर्जानगरचे प्रधान सचिव मनीष पाटील,बाळकृष्ण सोमलकर व ईतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी नारायण चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना फटाके फोडल्यामुळे होणारे दुष्परिणाम व वाचलेल्या पैशाचा सदूपउपयोग कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी फटाके फोडणार नाही असा संकल्प केला. या कार्यक्रमाला २०० चे वर विद्यार्थी हजर राहून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प घेतला व जवळपास रु.५० हजार रुपये वाचवुन त्यातून खाऊ, खेळणी, उपयोगी साहित्य, किल्ले बांधणी करिता खर्च करू असे सांगण्यात आले .
यावेळी शाळेचे शिक्षक सुर्तेकर, ढोणे व शिक्षिका सोनमाणे, मेश्राम व पराते आणि शाळेचे विद्यार्थी यांची उपस्थिती होती.















