prabodhini news logo
Home ठळक बातम्या भायंदर (पूर्व) प्रभाग क्र. ४ मध्ये अनधिकृत बांधकामांना कोणाचे संरक्षण?

भायंदर (पूर्व) प्रभाग क्र. ४ मध्ये अनधिकृत बांधकामांना कोणाचे संरक्षण?

0
353

स्वस्तिक इंडस्ट्री इस्टेट बी–२२ परिसरात कॉन्ट्रॅक्टर देवेंद्र पाटील व विजय धनेकर यांच्याकडून सुरू बेकायदेशीर बांधकाम —
तक्रार, पुरावे व छायाचित्रे सादर करूनही कारवाई शून्य!

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
8104170564
mojissports@gmail.com

भायंदर : भायंदर (पूर्व) प्रभाग क्रमांक ४ मधील स्वस्तिक इंडस्ट्री इस्टेट बी–२२, सलासार कमर्शियल समोर काही दिवसांपासून कॉन्ट्रॅक्टर देवेंद्र पाटील व विजय धनेकर या दोघांकडून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे समोर आले आहे.

सदर ठिकाणी मिरा-भायंदर महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत बांधकाम परवानगी नसताना काम सुरू असून, हे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (MRTP Act) च्या कलम ५२, ५३ आणि ५४ चे स्पष्ट उल्लंघन आहे.

या संदर्भात तक्रारदार पत्रकार मोजीस परमार (प्रबोधिनी न्युज नेटवर्क) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे तपशीलवार तक्रार, छायाचित्रांसह पुरावे सादर केले आहेत.

ही तक्रार खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे –

मा. राधा बिनोद शर्मा, आयुक्त, मिरा-भायंदर महानगरपालिका

मा. संभाजी पानापाटे, अतिरिक्त आयुक्त

मा. श्रीमती कल्पिता पिंपळे, उपायुक्त (मुख्यालय)
तसेच प्रभाग ४ अधिकारी स्वप्नील सावंत यांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली असून,
ले-इंजिनिअर सचिन पवार यांनाही ही तक्रार व्हॉट्सअॅप अ‍ॅपद्वारे पाठविण्यात आली आहे.

तरीसुद्धा आजपर्यंत महानगरपालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, हे अत्यंत धक्कादायक आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, इतके पुरावे आणि ईमेल तक्रारी दिल्यानंतरही प्रशासन गप्प बसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

> “देवेंद्र पाटील यांच्या मागे कोणती प्रभावशाली व्यक्ती आहे का?
की त्यांचा कोणाचा तरी नातेवाईक मिरा-भायंदर महानगरपालिकेत उच्च पदावर असल्याने हे प्रकरण थांबवले जात आहे?”
असे प्रश्न नागरिकांतून विचारले जात आहेत.

पत्रकार मोजीस परमार यांनी या प्रकरणाची माहिती नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई तसेच नगररचना संचालक, पुणे यांच्याकडे देखील सादर केली असून,
तात्काळ चौकशी करून जबाबदार अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जर पुढील काही दिवसांत कारवाई झाली नाही, तर हे प्रकरण राज्यस्तरावर आणि माध्यमांमधून मोठ्या प्रमाणात उचलून धरले जाणार आहे, असा इशाराही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here