
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटककार, नट, भाष्यकार, लेखक, कविंच्या कविता अशा एकंदरीत साहित्याचा खजिना असलेल्या ‘झाडी स्पंदन’ या ग्रंथाचे ५ व्या झाडीपट्टी नाट्यसंमेलन वडसा येथे गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ना.अँड आशिष जयस्वाल, संमेलनाध्यक्ष प्राचार्य के.आत्माराम,स्वागताध्यक्ष आ.रामदास मसराम, अभिनेते हास्यसम्राट भारत गणेशपुरे, पद्मश्री डॉ परशुराम खुणे, राकेशजी बेलसरे, माजी आ.कृष्णा गजबे,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेशजी गडेकर,झाडीपट्टी नाट्य विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिरूद्ध वनकर,मुख्य संपादक प्रा.डॉ राजकुमार मुसणे,डॉ शेखर डोंगरे,डॉ जनबंधू मेश्राम,डॉ धनराज खानोरकर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
सदर झाडी स्पंदन ग्रंथांस झाडीपट्टीचे वैशिष्ट्य दर्शविणारे आशयसूचक असे उत्कृष्ट मुखपृष्ठ किशोर उरकुंडवार यांचे आहे .यात सुरुवातील संमेलनाध्यक्ष के.आत्माराम यांचे अध्यक्षीय भाषण असून पुढे मंगेश मेश्राम,प्राचार्य डॉ श्याम मोहरकर,डॉ अनिरूद्ध वनकर,पद्मश्री परशुराम खुणे, रोशन पिल्लेवान,डॉ विजय रैवतकर,डॉ धनराज खानोरकर,देवेंद्र दोडके,डॉ संजय निंबेकर,डॉ राजकुमार मुसणे,डॉ जनबंधू मेश्राम,डॉ शेखर डोंगरे,संगीता टिपले, कांचन आत्माराम,किरपाल सयाम,किशोर उरकुंडवार, प्रल्हाद मेश्राम,प्रा संतोष मेश्राम यांचे वाचनीय लेख आणि कवी विश्वंभर गहाणे, धनराज खानोरकर,अजय राऊत, अरुण झगडकर, श्रीपाद जोशी, प्रा. संतोष बारसागडे, प्रदीप साखरेंच्या झाडीपट्टीवरील कवितां आहेत.एकंदरीत झाडीपट्टी रंगभूमीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा हा ग्रंथ अतिशय संस्मरणीय झाला असून झाडीपट्टी रंगभूमीचा एक महत्त्वाचा दस्तावेज म्हणून ती अभ्यासकांच्या कामात येणार आहे. सदर ग्रंथास आयएसबीएन नंबर प्राप्त झाला असून पूर्व वैदर्भीय लोकनाट्यकला व सांस्कृतिक अस्मितेच्या वैविध्यपूर्णतेचा मौलिक ठेवा असणारा संग्राह्य ग्रंथ म्हणजे हे ‘झाडी स्पंदन’ आहे.















