prabodhini news logo
Home कारंजा श्री.कामाक्षा देवी संस्थान कारंजाच्या सभागृहासाठी आ. सईताई डहाके यांच्या कडून निधी मंजूर

श्री.कामाक्षा देवी संस्थान कारंजाच्या सभागृहासाठी आ. सईताई डहाके यांच्या कडून निधी मंजूर

0
148

शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – कारंजा (लाड) : पौराणिक काळात,प्रभू श्रीरामचंद्राचे गुरुवर्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरुवर्य वसिष्ठ ऋषी यांच्या सप्तर्षी ऋषी असलेल्या करंजऋषी यांनी “कारंजा” क्षेत्राची निर्मिती करून स्थापन केलेली “आई श्री. कामाक्षा माता” ही कारंजेकरांची आद्यशक्ती आणि कुळदेवता म्हणून ओळखल्या जात असून सदहू मंदिराची नोंद निजाम सरकारच्या हैद्राबाद गॅझेट मध्ये सुद्धा नमूद केली असल्याचे आढळून येते.त्यामुळे सदर श्री कामाक्षा देवीचे पौराणिक मंदिर हे फार पुरातन आणि ऐतिहासिक मंदिर असून कारंजा शहरातील नगर पालिका कार्यालयाच्या बाजूला शहर पोलीस स्टेशन समोर आहे. येथे संपूर्ण भारतामधून मातृशक्ती उपासक हे दर्शनाला येत असतात.शिवकालीन काळात हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज श्री. कामाक्षा देवीच्या दर्शनास येवून गेल्याचा इतिहास आहे.अशी ही श्री.कामाक्षा माता भाविक भक्तांची इच्छापूर्ती किंवा मनोकामना पूर्ण करणारी देवता म्हणून ओळखल्या जात असून शेकडो लोकांची कुळदेवता म्हणून ओळखल्या जाते.कारंजा येथील डहाके घराणे श्री. कामाक्षा देवीचे निस्सीम भक्त म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे पंचवीस वर्षापूर्वी माजी आमदार स्व.प्रकाशदादा डहाके यांनी या मंदिराला प्रशस्त असे सभागृह बांधकाम मंजूर करून आणले होते.व त्यानंतर आता स्व. प्रकाशदादा डहाके यांच्या उत्तराधिकारी,कारंजाच्या पहिल्या महिला आमदार मा. श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके यांनी परत एकदा आपल्या विकास निधी मधून सभागृह बांधकामा करिता निधीला मंजूरी देवून तिस लाख रुपये निधी मंजूर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here