prabodhini news logo
Home कारंजा नरेंद्र गोलेच्छा यांचा ७२ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.

नरेंद्र गोलेच्छा यांचा ७२ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.

0
134

शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – कारंजा : भाजपाचे ज्येष्ठ नेते व जनसंघाच्या काळापासून राजकारणात सक्रिय भूमिका बजावत कारंजा-मानोरा मतदारसंघात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे नरेंद्र गोलेच्छा यांचा ७२ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता स्थानिक गुरुमंदिरात गोलेच्छा यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी अभिषेक करून करण्यात आली. यानंतर दिवाळीनिमित्त वृद्धाश्रमात फराळ व मिठाई वाटप करून वृद्धांना आनंदाचा क्षण देण्यात आला.

नंतर नरेंद्र नगरमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला. यानंतर त्यांच्या निवासस्थानी अभिष्टचिंतन सोहळा पार पडला, जिथे कार्यकर्ते व मित्रमंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

या निमित्ताने शहरातील व परिसरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून गोलेच्छा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नरेंद्र गोलेच्छा मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी गोलेच्छा यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत त्यांच्या दीर्घायुष्याची आणि उत्तम आरोग्याची सदिच्छा व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here