prabodhini news logo
Home चंद्रपूर आम्रपाली बुध्द विहारात धम्मचक्र प्रर्वतन दिन साजरा

आम्रपाली बुध्द विहारात धम्मचक्र प्रर्वतन दिन साजरा

0
215

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – ब्रम्हपुरी वाल्मिकी नगर येथील आम्रपाली बुध्द विहारात धम्मचक्र प्रर्वतन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
14 आँक्टोंबर 1956 या दिनी बाबासाहेबांनी नागपूर दिक्षाभुमी येथे बहुजनांना धम्म दिक्षा देऊन माणसाने माणसासारखे जगण्याचा अधिकार मिळवून दिला.त्याच दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष संगीता बांबोळे होत्या तर प्रमुख अतिथी योगिता रामटेके, रतिराम रामटेके,मदन शेंडे,वामन उंदीरवाडे,वसंता मेश्राम, कैलाश कांबळे हे होते.वाल्मिकी नगर ब्रम्हपुरी येथील उपासक व उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.कार्यक्रमाची सुरुवात बुध्द वंदना घेऊन करण्यात आली तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा संगीता बांबोळे यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचं पुजन करून धम्म ध्वज फडकविण्यात आले.व आम्रपाली विहारातील उपस्थित कार्यकारणीच्या हस्ते संगीता बांबोळे यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं सुत्रसंचालन गंगाधरजी शेंडे यांनी केलं.तर आभार किशोर खारर्डे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here