
जनतेच्या मनाशी नातं जोडणारं केंद्र
गोरगरीब, शेतकरी, कामकरी, युवक-युवती व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचं केंद्र ठरणार.
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती आघाडी महानगर, चंद्रपूरचे जिल्हा प्रमुख जितेशभाऊ कुळमेथे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन रविवारी (दि. 19 ऑक्टोबर 2025) सायंकाळी पाच वाजता उत्साहात पार पडले.
या उद्घाटनाचा मान चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. किशोरभाऊ जोरगेवार यांना लाभला. दुर्गामाता मंदिराजवळ, एम.बी. मॉडेल्स स्कूल, कृष्णानगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी परिसरात जल्लोषाचे वातावरण होते. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
आमदार किशोर जोरगेवार यांचा संदेश :
उद्घाटन प्रसंगी आमदार किशोरभाऊ जोरगेवार म्हणाले,
“जितेशभाऊंचे जनसंपर्क कार्यालय हे फक्त एक कार्यालय नाही, तर गोरगरीब, शेतकरी, कामकरी, मजूर, युवक-युवती आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे केंद्र ठरावे. हे कार्यालय लोकांच्या आशा-अपेक्षांचं प्रतीक आहे. ते पुढे म्हणाले,
“प्रभागात सकाळी फिरून नागरिकांच्या समस्या स्वतः शोधणारा, लोकांशी थेट संवाद साधणारा आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणजेच जितेश कुळमेथे त्यांचा लोकसंपर्क आणि कार्यशैली हाच भाजपचा खरा चेहरा आहे.”
जनतेच्या सेवेसाठी खुले कार्यालय :
आपल्या मनोगतात जितेश कुळमेथे म्हणाले,
“हे कार्यालय माझे नसून जनतेचे आहे. येथून प्रत्येक गोरगरीब, शेतकरी, मजूर, युवक-युवतींच्या अडचणींवर तत्परतेने उपाययोजना केली जाईल. समाजातील दुर्बल घटकांपर्यंत प्रशासनाचे लाभ पोहोचविण्याचे हे केंद्र ठरेल.”
कार्यक्रमात उत्साहाचा माहोल :
या प्रसंगी मंचावर भाजप शहर जिल्हाध्यक्ष सुभाष कसूनगोट्टूवार, रवि गुरूनुले महामंत्री, श्यामजी कनकम महामंत्री सविता दांडारे महामंत्री सारिका संदूरकर मंडळ अध्यक्षा रघुवीरजी अहिर, दिनकर सोमलकर प्रभारी मंडळ अध्यक्ष पप्पू बापचे, तपोष डे, प्रलय सरकार, सुशांत भद्रा, अलीममामू शेख, तथा अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. फटाक्यांची आतषबाजी व घोषणांमध्ये उद्घाटनाचा सोहळा जल्लोषात पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम खैरे यांनी केले, तर प्रास्ताविक स्वतः जितेश कुळमेथे यांनी सादर केले. व आभार प्रदर्शन सुधाकर राखुंडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व श्री.सिद्धार्थजी मेश्राम प्रवीण पंचबुधे ,एकनाथ मोहितकर,मुन्ना जाधव,विजय पाटील ,मनोज गणवीर विजय देशपांडे,निखिल कोडापे,महेश चहारे,मोरेश्वर मडावी,बाळू कुलमेथे,मुकेश पुरडकर,अविनाश मडावी सिंपल उरकुंडे, अतुल बोडे, दिलीप साहू, परशुराम चव्हाण ,अमित वाघमारे,प्रकाश राणे ,वैभव आंबाडे ,गजानन राऊत,विराज सुरपाम,राधेश्याम यादव,राकेश झुंगारे,कस्तुब महाकुलकर ,दिनेश शिंदे,करण पवार,अमित डाखवा ,मंगेश जाधव,मुकेश चित्रे ,प्रशांत खंडारे,दीप गजभिये समीर शेख,मौसिम शेख,रामभरोस निषाद,प्रभात निषाद,हर्षद चिरडे पूनम साहू सविता आगळे सुकन्या कापसे अनिमा भद्रा कृष्णा भद्रा प्रणोती मंडल माधुरी ढाली अंजली विश्वास पुष्पा मिस्त्री सौ.सविता हजारे कल्पना सरकार चंदाबाई दुर्गेवार यशोदा आंबेडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कृष्णानगर परिसरात ‘जनतेसाठी खुले कार्यालय’ या संकल्पनेने सुरु झालेले हे जनसंपर्क केंद्र नागरिकांमध्ये आशेचा किरण ठरत असून — “आपल्यासाठी कुणीतरी आहे” असा विश्वास आता लोकांच्या मनात निर्माण झाला आहे.















