
तृप्ती चिद्रावार कार्यकारी संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर दीक्षाभूमी येते ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन समारंभ उत्साहात साजरा होत असताना दीक्षाभूमी परिसरात अनेक युवकांनी एकत्रित येऊन दीक्षाभूमीवर होत असलेल्या विविध गलथान कारभारविरोधात संविधानिक मार्गाने आपले मत प्रदर्शित केले.
यावेळी अनेक युवक युवतीने आणि बौद्ध उपासक उपासकांनी तसेच आंबेडकरी अनुयायी यांनी दीक्षाभूमी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले.यात प्रामुख्याने दीक्षाभूमी स्मारकाचा विकास व सौंदर्यकरण कधी होणार,दीक्षाभूमी एकच परिवारातील सदस्य आहेत त्यामुळे बौद्ध आंबेडकरी जनतेच्या स्वाधीन करा,दीक्षाभूमी परिसरात अनावश्यक बांधकाम न करता बौद्ध आंबेडकरी अनुयायांसाठी जागा उपलब्ध रहावे,धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी दीक्षाभूमी परिसरात व्यावसायिक स्टॉल कशाला लावावे,दीक्षाभूमी स्मारक समितीत गैर बौद्ध व्यक्ती कशाला हवे असे सर्व प्रश्न उपस्थित केले.या प्रसंगी बौद्ध आंबेडकरी जनतेचे स्वाक्षरी अभियान सुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने घेण्यात आले या सर्व पार्श्वभूमीवर दीक्षाभूमी मुक्ती जनआंदोलनाला सर्वत्र पाठिंबा मिळाला आणि या पुढे सुद्धा असेच आंदोलन होणार असल्याचे यावरून समजते. या जनआनदोलना मध्ये ॲड राजस खोब्रागडे, ॲड प्रियांका चव्हाण, प्रोज्योत बोरकर,प्रणीत तोड़े,नकुल कांबळे, मयुर साखरे, राजेश घुटके, सिद्धार्थ शेंडे, विनम्र गेडेकर, संदीप लांडगे, चैतन्य पेटकर, हर्षवर्धन कोठारकर ,हर्षल खोब्रागडे, सुधांशु खोब्रागडे, वीरेंद्र खोब्रागडे यांची प्रथम भूमिका आणि सहभाग होता .















