prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आली दिवाळी

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आली दिवाळी

0
85

रंगबिरंगी दिवे घेऊन
सप्तरंगाच्या रांगोळीने
झगमगनाऱ्या फुलझड्या,
फटाक्यांच्या जल्लोषाने

आली दिवाळी आली दिवाळी
फराळ नानाविध हे बनले
लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी
रांगोळ्यांचे सडे हे सजले

फुले आंब्याच्या तोरणांनी
लक्ष्मीच्या पावलांचे ठसे
देव्हाऱ्यात थालीमध्ये
शिक्के नोटांच पैसा वसे

अंधारातून उजेडाची
दिशा दाखविण्या दिवाळी
भाऊबीजेच्या दिवशी
बहिण भावाला ओवाळी

लक्ष्मी पूजेला पैशांची रास
दिवाळी असते सर्वांसाठी खास
गोड धोड पकवान बनउणी
आप्तेष्टांशी येण्याची असते आस

रंजना भैसारे, नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here