prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आली दिवाळी

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह तर्फे विशेष कविता – आली दिवाळी

0
95

समुद्र मंथने उत्पत्ती जाहली पाच कामधेनूंची
नंदा नामक कामधेनू साठी पूजा वसुबारसेची
रांगोळी काढून, पणत्या लावून सुरुवात सणाची
दिपोत्सव सुरु होतसे घरोघरी तयारी रोषणाईची

केली जाते पूजा, धनाचे महत्त्व जाणून
व्यापारी वर्गात हिशोब वह्यांचे पुजन
प्राणांचे रक्षण होतसे करून यमदीपदान
धनत्रयोदशी दिवशी पुजती सकल धन

नरकासुर राक्षसाचा वध श्रीकृष्णाने करुन
सोळा हजार स्त्रियांना मुक्त केले कैदेतून
चांगल्याची सुरवात वाईटाचा नाश होऊन
नरकचतुर्दशीने दिवाळीची सुरुवात करुन

सर्व देवांना लक्ष्मीसह केले मुक्त
बळीच्या कारागृहातून
आश्विन अमावस्येला करूया
त्या प्रीत्यर्थ लक्ष्मीचे पूजन

कार्तिक शुद्ध प्रतिपदा मुहूर्त अर्धा
साजरा करुया दिवाळी पाडवा
सोने खरेदी, शुभ कार्य करुया चला
आनंद उत्साह येतसे भरभरून नवा

प्रेमाचे अनोखे बंधन भाऊबीज दिनी
माया बहीण भावाची नांदे आनंदानी
देवाच्या दारी महती तयांच्या स्नेहाची
ओवाळते भावाला बहीण प्रेमभरानी

(स्वरचित)
 नीला चित्रे
चिंचवड पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here