
दिप प्रज्वलीत करता
उल्हसित होई मन
दीपावलीच्या सणाने
प्रकाशमय होई जीवन
आश्विन मासात आली
सुंदर दिप दीपावली
सांगे आनंद येऊनी
साऱ्यांची घरे सजली
थंडीच्या मोसमात
येऊनी ही दिवाळी
दारी लावू पणत्या
दिव्यांची झळाळी
लुटा आनंद सणांचा
विघ्न नको फटाक्यांचे
दिवाळीची रांगोळी नि
लावू तोरण झेंडू फुलांचे
शुभेच्छांचा वर्षाव होई
वाढे गोडवा नात्यांचा
पाच दिवसाची दिवाळी
दीपोत्सव जल्लोषाचा
दिप लावू माणुसकीचा
सर्वांनी मानवधर्म पाळावा
विश्व भावना रुजवूनी
संदेश शांतीचा असावा
सौ.मेघा शहा.कोल्हापूर















