
शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – कारंजा (लाड): कारंज्यातील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात, समाजातील दुःखी कष्टी लोकांचे अश्रू पुसणारे हजरजवाबी अब्दुल राजीक शेख यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या सर्वपक्षिय सर्वधर्मिय मित्रमंडळी व चाहत्यांनी फार मोठ्या संख्येने गर्दी केल्याचे दिसून आले. या संदर्भातील अधिक वृत्त असे की, सर्वत्र आदराने ओळखले जाणारे व्यक्तिमत्त्व,अ.राजीक शेख यांचा वाढदिवस दि. २८ ऑक्टोंबर २०२५ रोजी मंगळवारी,अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.त्यांचे मित्र मंडळींनी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला कारंज्यातील सर्वपक्षीय नेते,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार तसेच सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अ.राजीक शेख यांच्या सामाजिक कार्याची आणि स्वभावाची प्रचितीच या वाढदिवसाच्या निमित्ताने आली. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचे गट-गटाने आगमन झाले आणि त्यांनी अ.राजीक शेख यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
नि:स्वार्थ सेवेमुळे लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर असलेले
अ.राजीक शेख हे त्यांच्या नि:स्वार्थ सेवाभावी वृत्तीसाठी ओळखले जातात.ते कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न ठेवता, सातत्याने लोकांची कामे करत असतात. ‘सर्वांना सोबत घेऊन चालणे’ हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. त्यांच्या कार्यामध्ये जात,पात, धर्म यासारखा कोणताही भेद नसतो.प्रत्येक गरजू व्यक्तीला ते समान मानून मदत करतात.
अ.राजीक शेख यांची आणखी एक महत्त्वपूर्ण ओळख म्हणजे त्यांची अन्यायाविरुद्धची कठोर भूमिका.कोणावरही अन्याय होत असल्याचे दिसल्यास ते त्यांना सहन होत नाही.आणि ते त्या अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभे राहतात. यामुळे सर्वसामान्य जनता आणि राजकीय क्षेत्रातील लोक त्यांचा प्रचंड आदर करतात.
त्यांच्या या स्वच्छ आणि निःपक्षपाती स्वभावामुळे त्यांना करंज्यातील लोक ‘अजातशत्रू’ मानतात.अजातशत्रू म्हणजे असा व्यक्ती ज्याचा कोणी शत्रू नाही,जो सर्वांवर प्रेम करतो आणि ज्यावर सर्व लोक प्रेम करतात. अ.राजीक शेख यांच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमात कारंज्यातील विविध सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती ही त्यांच्या लोकप्रियतेची आणि जनमानसातील आदराची साक्ष देत होती. या छोटेखानी कार्यक्रमामुळे कारंजा शहरात एक वेगळेच सामाजिक सलोख्याचे चित्र पाहायला मिळाले, जिथे सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीय लोक एकाच व्यक्तीला शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद लाठीया व सूत्र संचलन सुर्यकांत जिरापुरे यांनी केले
या कार्यक्रमासाठी कारंजा परिसरातील जेष्ठ मंडळी डॉ.मुंदे, उदयसिंग ठाकूर,विजय देशमुख ( तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी) दहातोंडे साहेब, राजुभाऊ अवताडे, हाजी रऊफ मामु ,शाम अढाऊ, ॲड.फारुख खान,जुम्माभाई पप्पूवाले, सलीम प्यारेवाले, मंजि भाई, सुधाकर जाधव, ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे, ज्ञानेश्वर घुडे, कदम, रवींद्र शाहकार, हुसेनभाई गारवे, लियाकत मुनींवले, इम्तियाज लुलानिया,कादर खान, तौशिफ खान , मनोज कानकिरड, दिलीप रोकडे, डॉ. ज्ञानेश्वर गरड, प्रदीप वानखडे, कैलास हांडे, शंकरलालजी कश्यप, महेश तिवारी, ढेल पाटील, गजुभट, रोमील लाठीया, विशाल अघमे,ओंकार काकडे, तौशिफ खान, पंजाबभाई, अतुळभाई, वशिमभाई, जुनेदभाई, रिजन भाई, सय्यदजावेद,खुददुस भाई,नावेद अहमद,आवेद भाई,कबीर अहमद,राजू लाहोटी, अफजलखान, सलीम खान, आतिक भाई पत्रकार,शमीभाई,निजांम भाई, इक्रम ठेकेदार, आरिफ ठेकेदार, शोएब खान इम्रान खान, गोपाल काजे, योगेंद्र जामनिक, सागर जामानिक,इ.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कारंजा नगरीतील ज्येष्ठ,श्रेष्ठ बरीच मंडळी उपस्थित होती. यावरून अब्दुल राजिक शेख यांचे शक्तीप्रदर्शन दिसून आल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी म्हटले आहे.















