
“स्व. प्रकाशदादा डहाके यांनी दिलेल्या वचनाच्या पूर्ततेकडे लागले भाविकांचे लक्ष.”
शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – कारंजा (लाड) : स्थानिक कारंजा मध्ये महाराणा प्रताप व्यायाम शाळा मंगरुळवेशीला लागूनच ‘भोईपूरा’ आहे.येथे संपूर्ण विदर्भातील एकमेव असलेले ‘आदिशक्ती श्री भिला माता संस्थान कारंजा’ हे संस्थान धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेले संस्थान आहे.कारंजा शहरातील ‘अंबाबाईच्या’ या एकमेव संस्थान मध्ये ‘चैत्र नवरात्रौत्सव’ आणि ‘आश्विन शारदिय नवरात्रौत्सव’ साजरा केला जातो.येथे नवरात्रात विविध आध्यात्मिक कार्यक्रम पार पाडल्या जात असल्याने या संस्थानला ‘सभागृहाची’ नितांत गरज आहे.त्यासाठी संस्थानतर्फे भाविकांनी अनेकवेळा सभागृहाची मागणी केलेली आहे. ‘विकासमहर्षी स्व. प्रकाशदादा डहाके’ हे आमदार असतांना या मंदिरावर स्वतः येऊन गेले होते.व त्यांनी या मंदिराला ‘सभागृह’ देण्याचे वचनही दिलेले होते.परंतु अद्यापपर्यंत सभागृह देण्यात आले नसल्याने भाविकांची गैरसोय होत आहे.त्यामुळे विद्यमान आमदार ‘श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके’ यांना देखील या संदर्भात संस्थान कडून लेखी निवेदन देऊन सभागृहाची मागणी करण्यात आली होती.परंतु अद्यापही त्या मागणीची दखल घेण्यात आली नसल्याने भाविकांसह संपूर्ण ‘भोई ‘ समाजामध्ये नाराजी पसरली आहे.यामध्ये महत्वाचे म्हणजे शासनाने यात्रा उत्सवातून वारेमाप उत्पन्न मिळविणाऱ्या,मोठमोठ्या संस्थानला सभागृहे देण्याऐवजी तळागाळातील गोरगरीब वस्तीत असणाऱ्या लहान लहान मंदिरे किंवा संस्थानला सभागृहे दिली तर समाजातील गोरगरीब व्यक्तींना या सभागृहामध्ये त्यांचे लहान मोठे सामाजिक व कौटुंबीक कार्यक्रम निःशुल्क पार पाडण्यास सहकार्य होईल. आणि या माध्यमातून गोरगरीबांच्या चेहऱ्यावरही समाधान आणि हास्य फुलवीता येणार असल्याची भावना भोई समाज बांधवांकडून आणि श्री भिला माता भक्तमंडळी कडून व्यक्त होत आहे.















