prabodhini news logo
Home कोरपणा प्रेरणा कॉलेजमध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा

प्रेरणा कॉलेजमध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा

0
125

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – गडचांदूर : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त युगचेतना ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था संचालित प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर येथे राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण आंबटकर सर होते. यावेळी मार्गदर्शिका मा.सरोज दासूद, परळी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. इजाज शेख ,प्रा.अंजना पवार, प्रा. दुर्गावती खुबाळकर,प्रा. पवन खनके, प्रा. क्रांती कासले , प्रा. राठोड, कुंजन शेंडे, यश ताकसांडे अर्चना मुत्यालवार यासह महाविद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या कार्यकर्त्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन शेख यांनी प्रस्ताविक प्रा.पवन खनके यांनी तर उपस्थितांचे आभार स्निग्धा कांबळे या विद्यार्थिनींनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here