prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – सदाफुली

प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – सदाफुली

0
104

हिरव्या पानी नाचत होती
सदाफुलीची गोड फुले
आमोदानी गिरक्या घेत
वाऱ्यावरती सहज फुले.(१)

मोहक त्यांच्या रंगाने
परिसर देखणा झाला
नकळत माझ्या पावलांना
जवळ घेऊनी गेला.(२)

गोड मुलांनो, गोड मुलांनो
कोणा संगे हासता नाचता
कोणी जवळी नसतात
आनंदात कसे रमता?(३)

सदाफुली ची राणी वदली
आम्ही आनंदाचे दूत ईशाचे
स्वानंदात रमतो आम्ही
भान नाही स्तुतीचे .(४)

जीवन आहे क्षणभंगुर हे
आम्ही आनंद गीत गातो
नाचत गात आम्ही
वनराणीची सेवा करतो.(५)

इवल्याशा त्या फुलांनी
नविन नजर मला दिली
स्वानंदात जगण्याची
नवी दिशा सदाफुलीने दिली.

अंजली गरगटे.(पुणे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here