
पैसा मोठा की माणूस मोठा
हा प्रश्न मनाला पडतो खरा
पैशाने सुख विकत मिळते
पण प्रेम पैशात नसे जरा
जग जिंकतो पैशाच्या बळावर
पण मन हरतं अहंकारावर
डोकावं थोडं अंतरी खोल
सुख दडलंय साधेपणावर
सोने चांदी नोटा कितीही
पण मन रिकामं नसावं
खरी श्रीमंती अंतरी वसे
प्रेम ज्ञान करुणा जपावं
नका सतत धावू पैसामागे
पैसा देतो क्षणभराचे सुख
पैसा आहे प्रवासाचं साधन
का तू ओढवून घेतो दुःख ?
खरं धन प्रेम आदर ज्ञान
तेचं देतं जीवनाला मान
माणुसकीतचं दडलंय धन
जगण्याचं खरं मोल जाण
माला मेश्राम,नवी मुंबई















