prabodhini news logo
Home महाराष्ट्र प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष लेख – पैसा

प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष लेख – पैसा

0
100

पैसा एक अविभाज्य घटक मानवी जीवनाचा. पैशाशिवाय जगणं याची कल्पनाच करता येत नाही. श्रीमंतातला श्रीमंत आणि गरीबातला गरीब सगळ्यांनाच लागतात पैसे जगण्यासाठी आणि आपल्या गरजा भागवण्यासाठी.
पैसा कमवायला लागते अक्कल आणि मेहनत .कष्ट करण्याची तयारी असेल तर पैसे मिळतो गरजेपुरता पण कामात तत्परता ,कौशल्य आणि व्यवहार चातुर्य याचा संगम झाला की तुमच्या कार्यात यश येतेच समजा आणि पैशाचा ओघ वळतो तुमच्याकडे .
जगण्यासाठी लागणारे वस्त्र ,अन्न, निवारा या मुख्य गरजांबरोबरच शिक्षण ही आवश्यक बाब आहे. नोकरी व्यवसायासाठी शिक्षणाबरोबरच कला कौशल्य शिकण्यासाठी ही पैसा लागतो. बदलत्या काळानुरूप मानवाच्या गरजा ही बदललेल्या आहेत. प्रत्येकाला मोबाईल, लॅपटॉप ,चार चाकी वाहन हवे असते . हि आजकालची फॅशन नसून गरज झालेली आहे.
समाजातली विषमता पाहता श्रीमंत आणि गरीबातला भेद काही मिटत नाही.
पूर्वीच्या काळी ही समाजातआर्थिक स्थितीत
तफावत होती आणि आताही ती आहे. पैसा माणसाचे सर्व रंग समोर आणतो अगदी छटांसहित. पैसा खिशात असेल तर माणूस स्वतःला श्रीमंत समजतो पण तो समाधानी असतो का हा मोठाच प्रश्न आहे?

पैसा पैसाच असतो
तुमचा आमचा सारखाच असतो
पैशापुढे माणूस झुकतो
हवे असेल ते प्राप्त करतो
नशिबाची साथ असेल तर
पैश्याचा ओघ वाहतो.
सत्कर्म करीत जगलात
तर पैसा पाठोपाठ येतो
पैसा पैसा करता करता
जगायचं विसरू नका
मानवतेच्या कल्याणासाठी
ओंजळ भरून द्यायला शिका

सौ.वंदना शशिकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here