
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील मौजा नवरगाव येथील सलमान सुभान खा पठाण या 30 वर्षीय युवकास चायनीजचा व्यवसाय करत असताना अचानक विद्युत तारेचा करंट लागलेला होता. यामुळे या युवकास विविध आजाराने ग्रासले होते. घरची हलाखीची परिस्थिती व होणारा महागडा उपचार अशा दुहेरी आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सलमान व त्याच्या कुटुंबाला सुचेनासे झाले होते. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालिका जयश्री नागापुरे (कावळे) यांना माहिती प्राप्त होताच त्यांनी नवरगावातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन संबंधित रुग्ण सलमान सुभान खा पठाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या उपचाराकरिता आर्थिक मदत देण्यात आली. याप्रसंगी प्रामुख्याने नवरगाव सरपंच राहुलभाऊ बोडणे, ग्रा. पं. सदस्य पंकज उईके, माजी शहराध्यक्ष सुशांत बोडणे, सचिव आनंद मेश्राम, ग्रा. पं. सदस्या श्वेता कामडी, काँग्रेस कार्यकर्ते सोपान कामडी, ठोनू जैस्वाल, प्रमोद कामडी, नितीन गेडाम, सर्फराज पठाण, रवी चौके, संजय कामडी, विजय कामडी, शैलेश कामडी व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.















