prabodhini news logo
Home औसा औसा नगरपरिषद मार्फत होणारे विकास कामे बोगस

औसा नगरपरिषद मार्फत होणारे विकास कामे बोगस

0
171

बोगसकामाला आधार कुणाचा :- अक्षय धावारे

औसा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : औसा नगरपालिका मार्फत शहरांत सध्या विविध विकास कामे चालू आहेत परंतू विकास कामाच्या नावाखाली बोगस काम चालू असल्याचे भिम आर्मी चे तालूका अध्यक्ष सिध्दार्थ कांबळे व त्यांच्या टीम ने नगरपरिषदचे मुख्यधिकारी साहेब यांना दि १०ऑक्टोबर २०२५ रोजी निवेदन देऊन निदर्शनास आणून दिले होते .संबंधित इंजिनियर, तसेच गुत्तेदार यांच्यावर चौकशी करून कारवाई ची मागणी केली होती एक महिना उलटला तरी अद्याप नगर परिषद कडून कारवाई झालेली नाही म्हणून दि ०३ नोहेंबर २०२५ रोजी भिम आर्मी भारत एकता मिशन च्या माध्यमातून औसा नगरपरिषद समोर तालुका संघटक सुनील जोगदंड हे आमरण उपोषणाला बसले आहेत या उपोषणात कटघर गल्लीतील रस्ता हा दुबारा करण्यात यावा तसेच औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णआकृती पुतळा बसवण्यात येईल आसे आश्वासन देऊन दोन वर्ष झाले तरी आद्याप कसलीच हालचाल झालेली नाही वरील मागण्या तात्काळ मागण्या कराव्यात तसेच उपोषण कर्त्याच्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी स्थानिक चे आमदार अभिमन्यू पवार, इंजिनिअर, गुत्तेदार आणि बोगस कामामध्ये सहभागी असलेला प्रत्येक अधिकारी हा जबाबदार असेल असा इशारा या उपोषणस्थळावरून अक्षय धावारे यांनी दिला या वेळी मागण्यासाठी भिम आर्मी मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे जिल्हा संघटक सोनू घोडके , भिम आर्मी जिल्हा संघटक समाधान कांबळे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे शहर अध्यक्ष मुज्जू शेख,भिम आर्मी खरोसा सर्कल प्रमुख प्रकाश अवचारे ,वंचितचे तालुका अध्यक्ष शिवाजी कुंभार, वंचित शहर अध्यक्ष सद्दाम पठाण शहर महासचिव वंचित इलीयस चौधरी मोतीराम मामा कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here