prabodhini news logo
Home ठळक बातम्या भीम आर्मी (भारत एकता मिशन) संघटनेची वर्धा येथे आढावा बैठक संपन्न

भीम आर्मी (भारत एकता मिशन) संघटनेची वर्धा येथे आढावा बैठक संपन्न

0
172

वर्धा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – भीम आर्मी संथापक,नगिना उ.प्र.खासदार एडोकेट भाई चंद्रशेखर आजाद आणि भीम आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा जिल्ह्यातील सामाजिक चळवळ गतीमान करण्यासाठी व बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वंचित शोषित पीडित विद्यार्थी कामगार या सारख्या अनेक समस्येवर लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी भीम आर्मी सामाजिक संघटनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तुषार पाटील आणी आशिष सलोडकर यांच्या आयोजनात भीम आर्मी भारत एकता मिशन संघटनेची आढावा बैठक घेण्यात आली. आणि भीम आर्मी वर्धा जिल्हा अध्यक्ष पदासाठी सर्वांच्या मते प्रदीप भाऊ कांबळे (रावण) यांचं नाव जाहीर केले. मिटिंग ला उपस्थित मान्यवर विदर्भ निरीक्षक शंकर भाऊ मुन यांनी सर्वांचे मत जाणून घेतले व मुख्य मार्गदर्शन केले, आणी आजच्या कार्यक्रमाचा प्रस्थाव समजून घेत भीम आर्मीचा महाराष्ट्र कमिटी कडे पाठविला.आजच्या या आढावा बैठकीला उपस्थित आजाद समाज पार्टी ,जिल्हा अध्यक्ष मनीष फुसाठे, माजी महाराष्ट्र संघटक भीम आर्मी आशिष मेश्राम, जिल्हा संघटक भीम आर्मी आशिष सलोडकर, माजी विद्यार्थी फेडरेशन जिल्हा अध्यक्ष अलंकेष पाणबुडे, अनुराग डोंगरे,शुभम डूबडूबे, रोशन झामरे, अजय मोटघरे, कुंदन मडावी, सुनील वनकर, संयोग तेलंगे, विजय मून,श्याम पोपटकर, यश मून, अक्षय कांबळे सैरभ नाईक, आशिष, अमोल तामगाडगे,समीर नाईक, अमित गवई, सुरज उईके, शैलेश आगलावे, अमन वाघमारे, सुरज मुरार, राजेंद्र, सोमेश आवडे, राजू थुल इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here