prabodhini news logo
Home चंद्रपूर हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर तर्फे हॉकी इंडियाला 100 वर्ष पूर्ती निमित्त हॉकी...

हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर तर्फे हॉकी इंडियाला 100 वर्ष पूर्ती निमित्त हॉकी सामने

0
149

सिनिअर खेळाडूंचा सत्कार

मुले, मुली व वरिष्ठ गटामध्ये सामने

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर तर्फे हॉकी महाराष्ट्राच्या निर्देशानुसार हॉकी इंडियाच्या 100 वर्षपूर्तीनिमित्त 7 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते 12 दरम्यान हॉकी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सेंट मेरी हायस्कूल दुर्गापुर, नारायण विद्यालय पडोली, लोकमान्य टिळक विद्यालय चंद्रपूर व ब्राईट हायस्कूल चंद्रपूर संघाने सहभाग नोंदविला. यामध्ये लोकमान्य टिळक विद्यालय चंद्रपूर प्रथम व ब्राईट हायस्कूल चंद्रपूर द्वितीय स्थानी राहिले. तसेच मुलींच्या सामन्यांमध्ये ड्रीम चंद्रपूर प्रथम तर सेंट मेरी हायस्कूल दुर्गापुर द्वितीय स्थानी राहिला. या स्पर्धेमध्ये वरिष्ठ गटाच्या सुद्धा प्रेक्षणीय सामना खेळला गेला. विजेता संघाला ट्रॉफी व मेडल प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने जितेंद्र चांदे – सहायक पोलीस निरीक्षक, किसान नवघरे – राखीव पोलीस निरीक्षक, सुरेंद्र गौतम, दीपक बेशेट्टीवार, मधुकर जुमडे, अब्दुल रहेमान, विनायक वडस्कर, दीपक दीक्षित प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष संदीप वैरागडे, उपाध्यक्ष शुभांकुल रामटेके, मिलिंद तेलंग, प्रभाकर टोगर, सचिव रुपेश सिंग चव्हाण, सहसचिव अनिल ठाकरे, कोषाध्यक्ष प्रेम गावंडे, सदस्य मनीषा घाडगे, सोनाली गावंडे, अमोल सदभइये, अजीज खान, दिनेश सावसाकडे, लोकेश मोहुर्ले, भारत विरुडकर, श्लोक मित्तल, अमन मंडल, आर्यन मोहुर्ले, श्रुती भारती, प्रियंका मंडल, शर्वरी लभाने, कोमल कुवर, करिष्मा राजपूत यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here