prabodhini news logo
Home कारंजा प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष लेख – घर….

प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष लेख – घर….

0
130

घराचे वैशिष्ट्ये खुप सांगितले जाते. घर हे पुर्व दिशेला असावे मुख्य दरवाजा पुर्व किंवा उत्तर दिशेला असावे. या व्यतिरिक्त स्वयंपाकरूम स्नानगृह बेडरूम सारख्या खोल्यांची रचना विशिष्ट दिशानिर्देशानुसार असावी. वास्तुशास्त्रानुसार
स्वयंपाक घराला विशेष महत्त्व दिले आहे. प्रवेश दाराजवळ हिरवे झाडे शुभ मानले जाते.
आपण मानव प्राणी असल्यामुळे ज्या प्रमाने अन्न वस्त्र-ची गरज आहे त्याप्रमाणे निवाऱ्याची गरज साहजिकच आहे ,जो तो आपल्या मर्जी व परिस्थीनुसार घर बांधत असतो मग ते घर गावात आहे का शहरात, ते कौलारू आहे का स्लॅपचे ते लहान आहे का मोठे त्याला अंगन आहे किंवा नाही याने फारसा फरक पडत नाही. घरात पृथ्वी, आकाश,पाणी, हवा, अग्नी या पाच तत्वाचे योग्य संतुलन असावे. हे सर्व सांगण्यात येत असले तरी प्रश्न उरतो तो घरातील खऱ्या माणसाच्या सात्त्विक पणाचा, घर हे कितीही अवाढव्य असले उंच भिंती रंगरंगोटी सर्व काही रितसर व टकाटक -पण घरातील माणसे जर कुदट वृत्तीचे असतील त्यांचा दुसऱ्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक विचाराचा असेल तर त्या घराचे पावित्र्य टिकून राहणे कठीणच. घर हे चार स्तंभावर उंभं असते,वैचारिकता, प्रामाणिकपणा, . नितीमत्ता, विनम्रता जिथे टिकून असते. तेच घर माणसाला घरपण देते, त्याला आपुलकी सहानुभूतीचे कंपाऊंड वात्सल्याचे गेट म्हणजेच प्रेम, माया, स्नेह यावर आधारित असलेलं वात्सल्य उगाच देखाव्यासाठी म्हणून नको प्रवेश करण्यासाठी असावे , वात्सल्य म्हणजे सर्वाप्रती असलेली सद्भावना असावी लालच,कपट, स्वार्थ व द्वेषाने वात्सल्याच्या दारातून प्रवेश केला तर सर्वच गोष्टीचे उलंघन झाले असे होईल नीतीचा बोध समजत नसेल तर वात्सल्याला अर्थ काय उरतो खऱ्या अर्थाने घराला घरपण व मनाला शांतीची चकाकी अनुभवावी वाटली तर शिल सदाचार व अष्टांगिक मार्गाने जाण्यासाठी फक्त मनाचे सात्त्विकपण व निर्मळता राखून ठेवावी म्हणजे आपोआपच घरात माणूसपण उंभ राहते व प्रेमाचे चार शब्द मुखातून बाहेर येते तेच घर माणसाचं कृतृत्व नेतृत्वाची दिशा पक्की करते.
मनात मनाचा मोठेपणा कर्तबगारीचे साहस, असेल आप्तेष्टाना सांभाळून वैचारिक क्षमता टिकवून ठेवण्याच सामर्थ्य प्राप्त झाले की सौख्य व मांगल्याचे संवर्धन केल्याने घराचे घरपण सुखशांती ,समृद्धी ,चैतन्य टिकून राहते. त्यासाठी कर्माचा वेगळा मार्ग निवडण्याची गरज नसते. म्हणजे घरात शिरण्यापूर्वी घरातील वैचारिकतेची ओळख होते व आपण आपल्याच घरात असल्याची भावना निर्माण होते, त्या घरातील माणसाचे सातत्य सत्यावर आधारीत असेल तर तिथे सत्कर्माला कोणीही
रोखू शकत नाही.या सर्व गोष्टींना भावनात्मक दृष्टीने पाहीले की खरे वैभव त्या घरात नांदत आहे याचा माणसाला अनुभव येतो, कुडाची झोपडी असो किंवा बंगला पण त्यात वास्तव्यास असलेली माणसे खरे आहेत का मुखवटे चढवलेली नकली,
कुठल्या विचाराची आहे, दुसऱ्या प्रती त्यांच्या मनात कुठल्या प्रकारच्या भावना आहेत यालाही महत्व दिले पाहिजे घर म्हणजे फक्त झोपण्या, उठण्या, बसण्या-साठी व खाण्यापिण्याची सोय व्हावी हा दृष्टीकोण साध्य करण्यासाठी नसतो , घर त्यागाचे प्रतिक असावे त्याच्या विटा कारूण्याच्या मातीत रुजलेल्या सिमेंटचा .. थर म्हणजे प्रामाणिकपणाने भिजलेले व पाण्याचे सात्त्विक पण त्यात ओतप्रोत भरलेले असावे. निढळीच्या घामाने बांधलेले, व नात्याच्या आपुलकीने सांधलेले व आंतरिक मनाच्या शुद्धतेत सात्विक पण राखलेले घर म्हणजे जणू नंदनवन असते.
चार भिंती प्रेम दया माया मैत्रीवर आधारित उभ्या असाव्यात , व घरात जाण्यासाठी सत्याची पायरी असली की घरात येणाऱ्या पै पाहुणे, आप्त नातेवाईक यांच्या मुखातून जाताना येताना ” नांदा सौख्य भरे ” मनोभावे व्यक्त करतील .
म्हणजे समोरच्या व्यक्तीला त्याच्या चांगुलपणाचे अवलोकन करताना सकारात्मक दृष्टिकोनाचा प्रकाश त्या घराला प्रकाशमान करण्यास सक्षम ठरते .
अशा घराला चुकूनही कोणाची नजर लागत नाही. या शिवाय घराची दुसरी व्याख्या काय असू शकते बरं…….?

नंदा भगत कारंजा लाड
वाशिम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here