prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – रम्य पहाट

प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – रम्य पहाट

0
100

पहाटेच्या प्रहरात
मंद हा पहाटवारा
व्यापे आसमंत सारा
तव उत्साही चेहरा

मज लुभावतो तुझा
धुंद पेहराव सारा
कुरळ्या बटांनी माझ्या
घातला मंद हा वारा

पहाटे दर्शन तव
पावलांचा रव मंद
जणू बासरीचा सूर
घुंगराचा लागे छंद

सख्या काय सांगू तुला
नाही लागत रे लक्ष
वेड लागले जीवाला
कधी येशील तू समक्ष

(स्वरचित)
©® नीला चित्रे
चिंचवड पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here