prabodhini news logo
Home ठळक बातम्या नागपूर येथे २३ वे ‘राज्यस्तरिय सामाजिक कार्यकर्ता संमेलन’ आणि भव्य पुरस्कार वितरण...

नागपूर येथे २३ वे ‘राज्यस्तरिय सामाजिक कार्यकर्ता संमेलन’ आणि भव्य पुरस्कार वितरण सोहळा.

0
154

नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : मदत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा.अँड.निल लाडे आणि संस्थापक सचिव दिनेशबाबु वाघमारे आणि संस्थेच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका सुनंदा वाघमारे यांच्या पुढाकाराने कार्यकारिणीच्या मार्गदर्शनात,घटनाकार महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला सन्मान समाजसेवेचे व्रत घेतलेल्या तळागाळातील सामान्य बहुजन समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्याना मिळाला पाहीजे.बहुजनांचे सेवाव्रती कार्य जगाला माहिती होऊन, सामाजिक कार्यकर्त्याचे मनोबल उंचावण्याच्या उदात्त हेतूने संस्थापक सचिव दिनेशबाबू वाघमारे हे स्वतः तन मन धनाने सेवारत राहून,दरवर्षी त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या,मदत सामाजिक संस्थेच्या वतीने,महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील सेवाव्रती कोहिनूर व्यक्तींची पुरस्काराकरीता निवड करून राज्यस्तरीय कार्यकर्ता महासंमेलनाचे आयोजन करीत असतात.रविवार दि.१६ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री.गुरुदेव सेवाश्रम, दिवंगत डॉ. प्रा. प्रकाशजी सोनक परिसर सभागृह नागपूर येथे २३ वे राज्यस्तरिय सामाजिक कार्यकर्ता संमेलन व भव्य पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. या संमेलनात भारतिय संविधान व लोकशाहीच्या भवितव्याविषयी कार्यकर्त्यांची भूमिका, फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी या विषयावर सखोल चर्चा होऊन सामाजिक कार्यकर्त्याच्या सामाजिक विकासाकरीता प्रस्ताव घेण्यात येवून शासनाला पाठविण्यात येतील. तसेच तमाम महाराष्ट्रासह भारतवर्षातील विविध कार्य क्षेत्रातील सामाजिक सेवाव्रती कार्यकर्त्याची दखल संस्थेने घेतलेली असून त्यामध्ये संघरत्न नरवाडे,विनोद पंडीत, विदर्भ लोककलावंत संघटना माहिलाध्यक्षा तथा ग्रामिण पत्रकार कांता लोखंडे, इंदिरा मात्रे,गानकोकीळा आशा सुरवाडे, स्त्री शक्ती मंच महाराष्ट्र संस्थापक अध्यक्षा शारदा भुयार, दिपीका खांडेकर, कल्पना साबळे,प्रतिभा ढोक, सुरेखा धर्माळे, विमल वाडकर, संतोषी भंडारी,निता मदनकार, उज्वला बोबडे, शारदा धनोकार, वंदना वाटाने, भजनी कलावंत मेघा आशिष गुल्हाने, प्रतिभा अर्डक,माजी न्यायाधिश डॉ. संतोषकुमार जयस्वाल, श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते हभप. अजाबराव महाराज ढळे, पत्रकार मंगेश देशमुख,महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद प्रदेशाध्यक्ष – विजयबाबू तेलगोटे, ईश्वरदास इंगळे,पत्रकार – विनोदकुमार गणवीर, पत्रकार – कालूभाई तवंगर, हवामान अभ्यासक – गोपाल विश्वनाथ गावंडे, झुंजार पत्रकार उषाताई नाईक, माधुरी वार्डेकर इत्यादी सेवाव्रती सामाजिक कार्यकर्त्यांच्या सेवेचा गुणगौरव म्हणून त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना संस्थेचे राज्यस्तरिय पुरस्काराचे मानपत्र, सन्मानचिन्ह, तिरंग्याची शाल व भारतिय संविधानाची प्रत देवून गौरविण्यात येणार आहे. या शाही संस्मरणिय कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा पश्चिम विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.विकास ठाकरे यांचे हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राधिकादेवी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक मा.गीरीष पांडव,मुख्य प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार मा.अभिजीत वंजारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी बॅक नागपूरचे अध्यक्ष मा. अनिल नगरारे, बार्टीचे नांदेड येथील तज्ञ मार्गदर्शक मा. सिद्धार्थ तलवारे, परिकमल सोशल वेलफेअर फाऊण्डेशन नागपूरचे अध्यक्ष मा. प्रविण पाटील, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यीक,लोककलावंत तथा पत्रकार आणि विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे संस्थापक अध्यक्ष मा.संजय कडोळे, स्त्री शक्ती मंच महाराष्ट्रच्या संस्थापक अध्यक्षा मा. शारदा भुयार,महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदचे प्रदेशाध्यक्ष मा.विजयबाबू तेलगोटे, नाळ चित्रपटाच्या अभिनेत्री मा. तक्षशिला वाघधरे, मातोश्री भागीरथाबाई शिक्षण संस्था पारशिवनीचे मा.उमाकांत बांगडकर, गुरुदेव सेवा मंडळ नागपूरचे अध्यक्ष मा.ॲड. अशोक यावले,माजी नगरसेवक मा. मनोज गावंडे,माजी नगरसेवक मा. वासुदेव ढोके, माजी नगरसेवक मा मनोज साबळे, नागपूर महानगर पालीका कर्मचारी बँकेचे माजी अध्यक्ष मा. ईश्वर मेश्राम, एकता सेवाभावी संस्था परभणीचे मा . अमजदखान, सामाजिक कार्यकर्ते मा . कृष्णा गोटफोडे, कविवर्य मा. सुदाम खरे, मा . राजेश चायंदे, प्रा . युवराज खोब्रागडे, प्रा . मंदाकिनी जवादे, साहित्यीक पद्माकर मंडवधरे व उपस्थित मान्यवर तथा सर्वच पुरस्कारार्थी सामाजिक सेवाव्रती कार्यकर्ते राहणार आहेत. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे हस्ते,रविवार दि. ०९ : ०० राष्ट्रसंत गुरुदेव श्री. तुकडोजी महाराजांच्या ०३:०० सर्व उपस्थित पुरस्कारार्थीच्या भोजनाची व्यवस्था (स्वयंसेवा) व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमा नंतर समोरोपिय संभाषणाने कार्यक्रमाची सांगता होईल. असे आयोजक अध्यक्ष अँड निल लाडे, संस्थापक सचिव दिनेश वाघमारे,उपाध्यक्ष नरेश खडसे, सहसचिव अरुण फुलझेले, कोषाध्यक्ष त्रिशरण पाटील, सदस्य धर्मेन्द्र (दामू) धनविजय, मुकुंदा दुधमोगरे,महिला सदस्या रेखाताई थूल आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा मार्गदर्शिका सौ सुनंदाताई वाघमारे आदींनी कळवीले आहे. असे वृत्त कार्यक्रमाचे आयोजक संस्थापक सचिव दिनेशबाबू वाघमारे नागपूर यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळवीले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here