prabodhini news logo
Home ठळक बातम्या मदत सामाजिक संस्थेच्या राज्यस्तरीय सेवाव्रती पुरस्काराची घोषणा

मदत सामाजिक संस्थेच्या राज्यस्तरीय सेवाव्रती पुरस्काराची घोषणा

0
309

“निर्भिड,निस्वार्थ,सेवेचे व्रत घेऊन समाज कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते,साहित्यीक, लोककलावंत,पत्रकार, महिला भगीनींचा होणार भव्य सत्कार.”

नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : केन्द्र तथा महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आणि सामाजिक न्याय विभागाच्या सामाजिक योजनांची व कार्यक्रमाची चोख अंमल बजावणी करणाऱ्या राज्यातील एकमेव अग्रणी असलेल्या, महाराष्ट्र दलित तरुण संघटना अर्थात मदत सामाजिक संस्था नागपूरच्या यंदाच्या सन २०२५ च्या विविध राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा,अध्यक्ष अँड. निल लाडे,संस्थापक सचिव दिनेशबाबू वाघमारे आणि मार्गदर्शिका सुनंदा वाघमारे नागपूर यांनी केलेली असून,प्राप्त माहितीनुसार यंदा वाशिम जिल्ह्याच्या संपर्कातील, स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून आणि प्रसंगी जीवावर उदार होऊन निव्वळ समाजसेवेकरीता पत्रकारिता करणाऱ्या नामांकित महिला व पुरुष पत्रकारांची आणि साहित्य,कला,सामाजिक क्षेत्रातील निवडक सेवाव्रती समाजसेवकांची निवड करण्यात आलेली आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने संघरत्न नरवाडे, विनोद पंडीत, विदर्भ लोककलावंत संघटना महिलाध्यक्षा कांता सुदाम लोखंडे,इंदिरा मात्रे, ‘वन उमेन सिंगर आर्मी’च्या गानकोकीळा तथा विदर्भ लोककलावंत संघटनेच्या अकोलाच्या जिल्हा महिलाध्यक्षा आशा सुरवाडे, भंडारज, झुंजार महिला पत्रकार तथा स्त्री शक्ती मंच महाराष्ट्राच्या संस्थापक अध्यक्षा शारदा भुयार,दिपीका खांडेकर, कल्पना साबळे, प्रतिभा ढोक, सुरेखा धर्माळे, विमल वाडकर, संतोषी भंडारी, निता मदनकार, उज्वला बोबडे, शारदा धनोकार, वंदना वाटाने, भजनी कलावंत मेघा आशीष गुल्हाने, प्रतिभा अर्डक, माजी न्यायाधिश डॉ. संतोषकुमार जयस्वाल, श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते हभप अजाबराव महाराज ढळे, पत्रकार मंगेश देशमुख, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद प्रदेशाध्यक्ष विजय बाबू तेलगोटे, ईश्वरदास इंगळे, पत्रकार विनोदकुमार गणवीर, पत्रकार कालूभाई तवंगर, वाशीम जिल्ह्यातील एकमेव हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे, पत्रकार उषा नाईक, माधुरी वार्डेकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न, प्रियदर्शीनी इंदिरा गांधी नारी सन्मान, छत्रपती शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक, डॉ बाबासाहेब आंबेडका पत्रकार पुरस्कार इत्यादी जाहीर झालेले असून, येत्या रविवारी दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी, नागपूर येथील श्री गुरुदेव सेवाश्रम, दिवंगत डॉ. प्रा. प्रकाश सोनक परिसर, रमण सायन्स तारांगण, शुक्रवारी तलाव नागपूर येथे राज्यस्तरिय सामाजिक संमेलनाच्या शाही समारंभात त्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष राधिकाबाई पांडव चॅरिटेबलचे संचालक मा. गिरीश पांडव, उद्घाटक नागपूर पश्चिम विधान सभा क्षेत्राचे आमदार मा. विकास ठाकरे, प्रमुख पाहुणे पदविधर विधान परिषद मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँकेचे अध्यक्ष मा.अनिल नगरारे, सामाजिक क्षेत्रातील साहित्यीक मा सिद्धार्थ तलवारे, .
परिकमल सोशल वेलफेअर फाऊण्डेशनचे मा. प्रविण पाटील, गुरुदेव सेवाश्रम नागपूरचे अध्यक्ष मा.अँड अशोक यावले, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त साहित्यीक,लोककलावंत तथा ज्येष्ठ पत्रकार आणि विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा (लाड) चे मा. संजय कडोळे,स्त्री शक्ती मंच महाराष्ट्रच्या संस्थापक अध्यक्षा तथा सुप्रसिद्ध महिला पत्रकार मा. शारदा अतुल भुयार कारंजा (लाड), महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद अकोलाचे प्रदेशाध्यक्ष मा.विजयबाबू तेलगोटे,सुप्रसिद्ध मराठी चित्रपट नाळ च्या अभिनेत्री मा. तक्षशिला वाघधरे,अध्यक्ष ॲड. मा.निल लाडे, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते तथा मदत सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव मा. दिनेश बाबू वाघमारे,मार्गदर्शिका सौ सुनंदाताई वाघमारे,इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. पुरस्काराचे स्वरूप महापुरुषांची प्रतिमा आणि प्रत्येक पुरस्कारार्थीच्या फोटोसह आकर्षक असे सन्मानचिन्ह असणार आहे. त्या सोबतच सन्मानपत्र, तिरंग्याची शाल आणि भारतिय संविधानाची प्रत देवून सर्व पुरस्कारार्थीना विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे. असे वृत्त नागपूर येथील मदत सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव दिनेशबाबू वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवीले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here