prabodhini news logo
Home ठळक बातम्या श्री. नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली येथे बालदिन उत्साहात साजरा

श्री. नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली येथे बालदिन उत्साहात साजरा

0
144

प्रबोधिनी न्युज नेटवर्क – १४ नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात बालदिन साजरा करण्यात आला मा. प्राचार्य सानप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका नाणेकर, पर्यवेक्षिका पंडित व सर्व अध्यापकांच्या उपस्थितीत करण्यात आले . शिवानी निगंशेट्टी इ ९वी ग या विद्यार्थिनीने फलक लेखन केले . या कार्यक्रमानिमित्त विविध वेशभूषेचे आयोजन करण्यात आले . इयत्ता पाचवी ड या वर्गातील रामचंद्र मोरे आणि रामेश्वर मोरे यांनी पोलिसांची वेशभूषा केलेली होती .त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम पाळा गुन्हेगारी टाळा . हा संदेश दिला. आर्या कांबळे या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून स्त्री शिक्षणाचे महत्त्व सांगितले .
इयत्ता सहावी मधील पूर्वजा तलवारे हिने वकिलाची वेशभूषा केलेली होती. इयत्ता पाचवी मधील प्रणव पिंपळे हा वारकरी वेशभूषेत आलेला होता . इतर विद्यार्थ्यांनी भाषणे करून आपला सहभाग नोंदवला .इयत्ता आठवी ग मधील अनुष्का वाघमारे आणि श्रेया सकट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .
शिक्षक मनोगतामध्ये बुरुड यांनी चि.वि.जोशी या लेखकांचा लेखनातील विनोदी किस्सा सांगितला .
पंडित यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
बोरचटे यांनी बालदिनाचे महत्त्व सांगून सर्वांचे आभार मानले .
शेवाळे, घरबुडे, पाटील, क्षीरसागर, अत्रे, सांडभोर, गंभीर, खराडे, शिनगारे मॅडम यांनी कार्यक्रम नियोजनात योगदान दिले. बुर्डे मामा रमेश कसबे यांनी कार्यक्रम व्यवस्था पाहिली बुरुड मॅडम यांनी सूत्रसंचलन केले .कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here