prabodhini news logo
Home कोपरगाव कोपरगांव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्राथमिक शाळा शहाजपूर येथे आज बालदिनमोठ्या...

कोपरगांव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्राथमिक शाळा शहाजपूर येथे आज बालदिनमोठ्या उत्साहामध्ये साजरा !

0
127

कोपरगाव प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती निमित्त बालदिन उत्साहात साजरा करत असताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या योजनेचे महत्त्व या बाल दिनानिमित्त विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
यावेळी विद्यार्थाना पंडित नेहरु यांच्या विषयी मुख्याध्यापक आद . रमेश निकम सर यांनी पंडित नेहरू यांना मुले का आवडत होती . जी मुले उद्याचे भविष्य होते ती मुले म्हणजे आजची फुले म्हणून पंडित नेहरूना गुलाबाचे फुल आवडत होते बाल दिना निमित्ताने ज्याज्या मुलांचे आई-वडील निधन झालेले आहे अशा मुलांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना प्रभावी पणे राबवण्यासाठी शहाजापूर जिल्हा परिषद मध्ये सर्व पालकांना माहिती देण्यात आली त्यामध्ये अंगणवाडी सेविका उशा काळे यांना ही माहिती देऊन जास्तीत जास्त पालकांना या योजनेचा लाभ कसा देता येईल याचीही माहिती यावेळी बालसंगोपन योजनेसाठी अर्ज करणाऱ्या पालकांना देण्यात आली बाल दिनानिमित्त बालसंगोपन योजनेचे लाभार्थी आज जिल्हा परिषद शाळेत आवर्जून उपस्थित होते .बाल संगोपन योजना राज्यामध्ये प्रभावीपणे राबवण्यासाठी बालरक्षक टीम व राज्यांमध्ये अनेक ठिकाणी रमेश निकम सर हे भेट देत आहे व राज्यामध्ये ते असा दौरा करणार आहे . गरजू गरीब निराधार बालकांसाठी राज्यामध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी भेट देऊन या योजनेचा लाभ प्रत्येक जिल्हयात तालुक्यात गावामध्ये कसा देता येईल शिवाय अडीअडचणी दूर करून जास्तीत जास्त निराधार बालकांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनेक पालकांची घरोघर भेट घेऊन या योजनेची माहिती ते देत आहे शासनाला या योजेनेसाठी जास्ती जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री गृहमंत्री समाज कल्याण मंत्री यांना भेट देऊन निवेदन देणार आहे . क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना राबवीत असताना प्रत्येक महिन्याला निराधार बालकांना 2250 रुपये प्रत्येक महिन्याला मिळत असल्याने त्या पालकांना शिक्षणासाठी तो आधार आज मिळत आहे . शिवाय कोरोना आणि निधन झालेले पालकांना 4500 रुपयाचे प्रत्येक महिन्याला लाभ मिळत आहे. शिवाय कोपरगाव तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा, खाजगी शाळा प्रामुख्याने सुरेगांव येथिल राधाबाई काळे कन्या विद्यालय गौतमनगर सुरेगाव ,छत्रपती शिवाजी विद्यालय छत्रपती संभाजी विद्यालय ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशा अनेक शाळेमध्ये आज निराधार बालकांना लाभ देण्यात आला. त्याबद्दल राज्याचे अध्यक्ष रमेश निकम सर यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये बालरक्षक प्रभावीपणे काम करत आहे . त्याचप्रमाणे बाल संगोपन योजनेसाठी मदत करणाऱ्या सर्व सेवकांचे अभिनंदन केले प्रत्येक जिल्ह्यामध्येही योजना राबवता असल्याने ही कशी प्रभावीपणे राबवण्यासाठी लवकरच राज्याची बैठक लावण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे बाल रक्षक बाल संगोपन कमिटीचे महासचिव भिमराव मगरे सर यांनी माहिती दिली . कारण जास्ती जास्त निराधर बालकांना या योजनेचा लाभ मिळेल .बाल दिनानिमित्त विद्यार्थ्यांना जि प . शाळेत शैक्षणिक वस्तू चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना वेळोवेळी अडचणीच्या वेळीधावून जाणारे व राज्यांमध्ये वस्तीशाळेतून काम करत असताना जो गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचा आनंद मिळत असल्याने त्यांनी भविष्यात या योजना निश्चितच विद्यार्थ्यांना लाभदायक ठरतील अशी आशा यावेळी निकम सर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितली.यावेळी शाळेचे उत्कृष्ट काम करणारे उपाध्यपक रियाज शेख यांनी मुलांना पंडित नेहरू विषयी अनमोल अशी माहिती सांगितली.यावेळी पालक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here