
भाजपा नेते, माजी आमदार प्रा. अतुल देशकर व भाजपा नेते दिपक उराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा संपन्न.
ब्रह्मपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – १५ नोव्हेंबर २०२५ ब्रह्मपुरी नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर ब्रह्मपुरी शहरातील अनेक दिग्गजांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज भाजपा नेते, ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर व भाजपा नेते दिपक उराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला.
माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात माजी नगरसेविका अंजली उरकुडे, माजी नगरसेविका रूपाली रावेकर, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अंकज कांझोडे, सामाजिक कार्यकर्ते मोबिन शेख, सामाजिक कार्यकर्त्या चेतना खवले, सामाजिक कार्यकर्त्या अर्चना संजय उईके, सामाजिक कार्यकर्त्या सूर्यकांता गेडाम, उमेश रावेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे ब्रह्मपुरी नगर परिषद निवडणुकीत भाजपाल अधिक बळ मिळाले असल्याचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांनी प्रतिपादन केले.
या पक्ष प्रवेश सोहळ्याप्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे, माजी शहर अध्यक्ष अरविंद नंदुरकर, शहर महामंत्री मनोज भुपाल, माजी नगरसेवक मनोज वठे, जिल्हा सचिव साकेत भानारकर, जिल्हा सचिव रश्मी पेशने, शहर महामंत्री पवन जयस्वाल, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस तनय देशकर, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा वर्षा चौधरी, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अमित रोकडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.















