
मागील दहा वर्षापासून ब्रम्हपूरी विधानसभेचे लोकप्रतीनीधीत्व करत विकासकामात्मक दुरदृष्टीकोनातुन मतदारसंघांचा चेहरामोहरा बदलविला आहे. ब्रम्हपूरीच्या या विकासात्मक बदलामुळे राज्यात ब्रम्हपूरी शहराची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
शहरातील विविध शासकीय कार्यालयांच्या प्रशस्त इमारती व इतर भौतिक सोयीसुविधांनी शहराच्या सुंदरतेत भर घातली आहे. या सर्व विकासकामांनी भारावून जात ब्रम्हपूरी शहरातील पटेलनगर प्रभागातील अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
ब्रम्हपूरी शहरातील कमलाई निवासस्थानी अनिल दोनाडकर, प्रा.रवी मैंद, सौ.किर्ती रमेश पारधी यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये किर्ती रमेश पारधी, जयश्री अनिल बावनकसे, पल्लवी विवेक नरूले, छाया जगदीश उरकुडे, गायत्री गुलाब उरकुडे, गायत्री सचिन निशाने, मंगला देविदास ठाकरे, वंदना नेवारे, वैशाली सराटे, वैभव सराटे, हितेश सोमेश्वर कुंभारे, अंकुश पाडवार, योगेश पारधी, मारोती बागडे, शरद खलोदे, गुणवंत पाडवार, निखील पातर, शुभम पाडवार, मयुर नेवारे, राहुल कुंभरे यांच्यासह कवडुजी सहारे आणि अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, मनोज वझाडे, अर्पिता अनिल दोनाडकर, सपना संजय बल्लारपुरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
विकासाचा दृष्टीकोन आणि त्याला जनतेची साथ यामुळे पटेलनगरसह ब्रम्हपुरी शहरात काँग्रेस पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे.















