
गडचिरोली, आरमोरी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी प्रभागनिहाय आढावा घेत उमेदवार आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
निवडणूक ही केवळ प्रचाराची स्पर्धा नसून जनतेच्या विश्वासाची परीक्षा आहे. जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत घराघरात पोहचत संवाद साधा. कार्यकर्त्यांची एकजूट हीच खरी काँग्रेसची ताकद आहे.
केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या अपयशांवर ठोस पुराव्यासह संवाद साधा. स्थानिक समस्या, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य व नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर काँग्रेसची स्पष्ट भूमिका जनतेसमोर मांडा, वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या सरकारच्या अपयशांना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचवा. विशेषतः तरुण व महिला मतदारांना विशेष प्राधान्य देत त्यांच्यापर्यंत आपल्या पक्षाचा विचार पोहाचवावा असे आवाहन केले.
यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रभारी संदेश चिंगलवार, गडचिरोली काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.















